मलकापूर बाजार समितीच्या सभापतीपदी संजय काजळे पाटील बिनविरोध

Khozmaster
2 Min Read

मलकापूर 🙁 शहर प्रतिनिधी )
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत संजय काजळे पाटील यांची अविरोध निवड करण्यात आली.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदरचा अविश्वास ठराव पारीत झाला. त्यानंतर त्यांनी या अविश्वासा विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. न्यायालयाने त्यांनी दाखल केलेली याचिका खारीज केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यासी अधिकारी एम.ए. कृपलानी यांनी ७ जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली होती. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीकरीता आज ७ जानेवारी रोजी आ. चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात भाजपा-शिवसेना महायुतीचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले. यावेळी निवडणूक प्रक्रिया अनुषंगाने महायुतीच्या वतीने संजय काजळे पाटील यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला तर भाजपाचेच योगेश पाटील यांनी सुध्दा आपला नामांकन अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सदर निवडणूक ही अविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यासी अधिकारी एम.ए. कृपलानी यांनी जाहीर करून सभापती पदी संजय काजळे पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हजर होते. संजय काजळे पाटील यांची सभापती पदी निवड होताच कृउबास समोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. तर संजय काजळे पाटील यांचे उपस्थित असलेल्यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांना शुभेच्छा दिल्या

0 9 5 0 6 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *