समर्थ कृषी महाविद्यालयामध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा :- ( दत्ता हांडे )
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात 6 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आले.  डॉ संदीप हाडोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा विद्यापीठ समन्वयक रासेयो, डॉ पं.दे.कृ.वी., अकोला यांच्या निर्देशानुसार युथ फॉर माय भारत या संकल्पनेवर आधारित शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सतीश कायंदे, सचिव श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था व संतोष महल्ले, पोलीस निरीक्षक, देऊळगाव राजा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक स्व.देवानंद कायंदे व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रसंगी रा.से. यो. सहकार्यक्रम अधिकारी प्रा.अश्विनी जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी त्यांनी पुढील सात दिवसात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा शिबिरा अंतर्गत शोषखड्डे, बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती, महिला आत्मसंरक्षण, आरोग्य विषयक जनजागृती, मोबाईलचे दुष्परिणाम, ग्राम स्वच्छता, पर्यावरण जन, शैक्षणिक जनजागृती, कृषी ज्ञान प्रसार, जलसंवर्धन, मतदानाविषयी जनजागृती व विविध विषयांवर  व्याख्याने इत्यादी उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले.  याप्रसंगी संतोष महाल्ले यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून तरुण पिढीला स्वावलंबी बनविण्यासाठी  प्रोत्साहित केले व कृषी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी रासेयो स्वयंसेवकांना त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश कायंदे यांनी रासेयो स्वयंसेवकांनी गावकऱ्यांकडून शेती विषयक प्रात्यक्षिक कार्य व पाहणी करून त्यांची पुरेपूर माहिती मिळवावी व शिबिरातून त्यांचे अनुभव घ्यावे याबद्दल रासेयो स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून सुनील मांटे, मुख्याध्यापक, कौशल्या दंदाले सरपंच, डॉ. नितीन मेहेत्रे, प्राचार्य समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, बद्री दंदाले, श्रीकृष्ण दंदाले, सुदाम दंदाले, विठोबा दंदाले, विजय बरंडवाल, खंडेराव डोईफोडे, प्रभाकर दंदाले उपस्थित होते. प्रा.किरण ठाकरे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी, प्रा विलास सातपुते, प्रा सचिन सोळंकी, प्रा देवानंद नागरे, प्रा मंगेश धांडे, प्रा विकास म्हस्के, प्रा सोनाली इंगळे, प्रा प्रणाली पान्हेरकर, श्रीहरी काळुसे रा.से.यो स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे व डॉ.संदीप हाडोळे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा विद्यापीठ समन्वयक, रासेयो डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,  दादाराव मुसदवाले, गटशिक्षण अधिकारी, देऊळगाव राजा यांनी शुभेच्छा दिल्या.

0 9 5 0 6 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *