सिंदखेडराजा:-(विशेष प्रतिनिधी)
सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टीवर भव्य जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पार पडला. राष्ट्रमाता जिजाऊ जनमोत्सव सोहळ्यात मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवधर्म पिठावून उपस्थितांना संबोधित करतांना म्हटले की, मला सांगताना आनंद होतो की, भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष सुरू आहे आणि माझे सुध्दा अमृत महोत्सव वर्ष सुरू आहे. जगाच्या पाठीवर भारतासह अगदी आपल्या जिल्ह्यातही आणि राज्यातही अनेक लोक तोंडामध्ये सोन्याचे, चांदीचे चमचे घेऊन जन्माला आलेले आहेत. पण पुरुषोत्तम खेडेकर एकमेव असा आहे की, जो हातामध्ये संविधान घेऊन जन्माला आलोय असं म्हणलं तरी हरकत नाही, असे सांगून खेडेकर यांनी लोकशाही व संविधानाचं जोरकसपणे समर्थन केलं. केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलेल्या खंते बद्दल, या जिजाऊ सृष्टीवर नेहमीसारखा गर्दीचा लोट दिसत असला तरी त्यात पाहिजे त्याप्रमाणे मध्ये शिस्त वाढवता आली नाही. याबद्दल आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये काम करावं लागणार आहे. आजच्या या ४२७ व्या जिजामातेच्या जयंती निमित्त आणि माझ्या अमृत महोत्सवी सत्कार निमित्त या जिजाऊ सृष्टीवरील या भव्य-दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजिनिअर विजय घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला. मराठा सेवा संघ हा काही मी एकट्याने केला अशातला भाग नाही. जसा शिवराज्याबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल बोललं जातं. महाराज सांगायचे की, हे स्वराज्य निर्माण केले हे जरी खरं असलं त्यातला व मीएक असलो तरी मावळे जे आहेनायांचे योगदान यामध्ये आहे. जीवाची परवा न करता जे काही लढलेले आहे. त्यांचं काम मोठे आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जो काही माझा सत्कार केल हा एकटा पुरुषोत्तम खेडेकर, रेखाताई खेडेकर, स्वप्निल, सौरभ, स्नेहाचा नाही तर सर्वांचाच यामध्ये वाटा आहे, याचा मला अभिमान वाटतो. आपल्याला सर्वांना पुन्हा-पुन्हा सांगतो की, स्वतःहून स्वतः च्याबळावर आपण उभेराहिले पाहिजे. सदरील जिजाऊ जन्मोत्सवासाठी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव, जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर, मेहकरचे आमदार सिध्दार्थ खरात, सिंदखेडराजा चे माजी आमदार शशिकांत खेडेकर, चिखलीच्या माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड चे महाराष्ट्रभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो जिजाऊ भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
मी मात्र हातात संविधान घेऊन जन्माला आलोय : शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर
0
9
5
0
7
1
Users Today : 19
Leave a comment