मेहकर:- (शहर प्रतिनिधी)
हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालय येथे दि. १२ जानेवारी रोजी माँ जिजाऊ जन्मोत्सव, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. सर्वप्रथम पालखीचे पूजन अमरावती विभाग शिक्षक आमदार अॅड. किरण सरनाईक, संस्थाध्यक्ष माधव आरसोडे, प्रा. चोपडे सर, प्रा. महके सर, पो.पा. सी. कावेरीताई गाडे, सरपंच सौ. सुनिताताई उतपुरे, सरपंचपती संजय उतपुरे जानेफळ केंद्रप्रमुख देशमुख व प्राचार्य संजय जारे सर यांचे हस्ते संपन्न झाले. सर्व मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर किरण सरनाईक यांनी आपल्या मनोगणामधुन संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाप्रती गौरवोद्वार कावले. तसेच विद्यालयाच्या सर्वच उपक्रमांचे कौतुक केले. यानंतर सर्व मान्यवरांच्या पालखी प्रस्थानाच्या अनुमतीने सोहळ्याला सुरवात झाली यामधे ध्वजधारी विद्यार्थी, पिसआर्मी, पताकाधारी, टाळकरी, अब्दागीरी, भालदार, चोपदार, संत गजानन महाराज पालखी, घोड्यावर स्वार माँ जिजाऊंची व क्रांतिज्योती सावित्रीबाई फूले यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थीनी, व युगपुरुष स्वामी विवेकानंद याची वेशभूषा केलेला विद्यार्थी आणि सर्व सुसज्जतेसह असणारी मुख्य पालखी. यानंतर सर्व नगर प्रदक्षिणेमधे सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या देखाव्यांचे क्रमशः सादरीकरण करण्यात आलेसामाजिक देखाव्यामधे बालविवाह व सतीप्रथा, महाराष्ट्राचे सर्व समाज सुधारक व मोबाईलचे दुष्परिणाम या देखाव्यांनी लोकांना जागृतीचा संदेश दिला. देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवतांना कोळी संस्कृती, राजपुत संस्कृती, मेघालय संस्कृती, मणिपूर संस्कृती, हरीयाणा संस्कृती, छत्तीसगढ़ संस्कृती, गोवा संस्कृती व उत्तराखंड संस्कृती चे विलोभनीय व ज्ञानवर्धक देखावे सादर केले गेले. वैज्ञानिक क्षेत्रातील चांद्रयान ३ या देखाव्याने लोकांचा वैज्ञानिक दृष्टीकोण दृढ केला. यामधील धार्मिक देखाव्यामधे श्री काकुआई दर्शन, श्री बालाजी दर्शन, शिव पार्वती विवाह, कुंभमेळा व कावड यात्रा, यांचा समावेश करण्यात आला होता. तर ऐतिहासिक देखाव्यांमधे छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान भेट, छत्रपती संभाजी महाराजांचे चीरमरण, राणी पद्मावतीचा जोहर, भारतरल डॉ. वाचासाहेब आंबेडकर जीवन दर्शन है होते.या सोबतच ढोल पथक लेझिम पथक व टिपरी पथकाने संपूर्ण पालखी सोहळ्याचे आकर्षण कायम राखले. या कार्यक्रमाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी अलोट गर्दी केली होती. पालखी सोहळ्यातील सर्वच देखाये, त्यांचे सादरीकरण, नियोजन व शिस्त याबद्दल सर्व उपस्थितांनी प्रशंसा केली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व सेहजनांचा व परिजनांचा प्राचार्य संजय जारे सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सुरक्षिततेने व रहदारीला अडथळा होणार नाही या साठी जानेफळ पोलीस स्टेशनचे व ग्रामपंचात हिवरा खुर्दचे सहकार्य लाभले. तद्वतच विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था, पुरुषोत्तम खत्री, गजानन गायकवाड, श्री कृष्णा गाडे, बिस्कीटाचे चाटप सरपंच सौ. सुनिताताई उतपुरे व ग्रा.पं. हिवरा खुर्दचे वतीने वितरीत करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या वतीने केळीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व जिजामाता परिवाराने परिश्रम.
जिजाऊ नामाचा गजर; निनादले हिवरा खुर्द नगर !
0
9
5
0
7
1
Users Today : 19
Leave a comment