श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

Khozmaster
2 Min Read

खामगाव: (शहर प्रतिनिधी)
स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा आज दि १२-१-२०२५ रविवार रोजी सकाळी १२ वा मंडळाच्या संस्थापक एकनिष्ठ संचालिका सौ पार्वती बाई सुकाळे यांच्या घरी राष्ट्रमाता, राजमाता मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला व लोक माता पुण्यश्रीक देवी श्रीअहिल्यादेवी होळकर, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कुंकुम तिलक लावून. पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करून मा जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले या वेळी बुष्ठी आणि युक्ती च्या जोरावर मा साहेब जिजाऊंनी अशक्य ते शक्य करून दाखविले स्वराज्य निर्माण केले. स्वामी विवेकानंदानी ध्येय पुर्ती होईपर्यंत थांबु नका असा संदेश दिला महापुरुषांचे विचार व कार्य समाजाला कायम प्रेरणा देत असतात असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांनी केले राजमाता मा जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या वेळी ते बोलत होते जिजाऊ वंदना घेऊन अल्पोपहार, चहा वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आलीया प्रसंगी जेष्ठ साहेबराव सुकाळे, महादेवसर सुकाळे, भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे, आशाबाई अंधारे, सुशिला आवलकर, पार्वतीचाई सुकाळे मंगला बावस्कर, शकुंतला ढवळे, जयाबाई सुकाळे, जयश्री झापर्डे, रजनी सुकाळे, आरती सुकाळे, मंजरी सुकाळे, मक्ती सुकाळे, धनश्री सुकाळे, भुमी सुकाळे, स्वाती ठोसर, गुंजा ठोंबरे, संध्या ठोंबरे, सिध्दिका निवल, लाडो यादव, आसा इटनारे, पुजा इटनारे, प्रिया यादव, आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद सुकाळे यांनी केले अशी माहिती श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.

0 9 5 0 7 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *