मालेगांव :- ( इमरान सैय्यद )
शहरातील ना.ना. मुंदडा विद्यालयामध्ये आयोजित क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन १४ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी पूजा भटकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक त्र्यंबक गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आशिष मुंदडा हे होते. तर, प्राचार्य दिनेश उंटवाल आणि पर्यवेक्षक राजपूत, एस. एल. मुंदडा, देवानंद ताजने यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्र्यंबक गायकवाड यांनी खेळ आणि कला प्रांतात नैपुण्य मिळविण्याकरिता जिद्द, चिकाटी आणि साहस या गुणवैशिष्ट्याची आवश्यकता असते
तसेच जो पहिला असतो त्याचेच जगात स्मरण होते म्हणून आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये सरस आणि पहिल्या क्रमांकाची कामगिरी करा, असे आवाहन मार्गदर्शन करताना केले. तसेच भटकर यांनी खेळाचे महत्व विशद करताना म्हणाल्या की, केवळ खेळ आणि खेळ यामुळेच मी क्रीडा अधिकारी या पदावर पोहोचू शकले. म्हणून खेळामध्ये सुद्धा व्यावसायिक संधी आपण प्राप्त करू शकतो.
प्राचार्य दिनेश उंटवाल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी क्रीडा व कला महोत्सवात वैक्तिक व सांघिक क्रीडा व कला प्रकारामध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य प्रदर्शित करावे. असे आवाहन केले. ज्येष्ठ शिक्षक गजानन कुबडे, एस. एल. मुंदडा, देवानंद ताजने, संजीव भोंडणे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीराम रोडे यांनी केले. शिक्षक संदीप अंभोरे यांनी संचलन केले.तर, सिद्धार्थ भालेराव यांनी आभा मानले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता गणेश इंनाणी, सुधीर सारडा, विजय घुगे, विठ्ठोबा काटेकर, आकाश इंगळे, विजय गजभार, गुलाब मोहलें यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
Users Today : 19