मालेगांव :- ( इमरान सैय्यद )
आधीच भ्रष्टाचाराने ग्रस्त असलेल्या मालेगांव पंचायत समिती मधील चार कंत्राटी (गृह) अभियंता यांनी सामुहिक राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. विशेष म्हणजे हे राजीनामे त्वरित मंजुर करून त्यांना पुन्हा कामावर रुजु करण्यात येऊ नये असे पत्र सभापती सौ रंजना मधुकर काळे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे मालेगांव पंचायत समिती या आधीही अनेक कारणामुळे चर्चेत आली आहे. त्यामधे मोठ्या प्रमाणावर बोकाळलेला भ्रष्टाचार हे प्रमुख कारण असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे . या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनेक अधिकारी व कर्मचारी हे निलंबित झाले आहेत तर काहींना कारागृहाची हवा सुद्धा खावी लागली आहे. आताही भ्रष्टाचार हा शिगेला पोहोचला आहे. घरकुल असो की विहीर असो किंवा इतर कोणत्याही योजना असो पैसे दिल्याशिवाय कोणत्याही सर्व सामान्य माणसाचं काम या ठिकाणी होत नाही. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत नुकतेच पांगरी नवघरे येथील एका युवकाने पांगरी नवघरे गावात मंजूर झालेल्या व संपूर्ण पैसे उचललेल्या घरकुलांची ..
तपासणी करावी. त्यामध्ये नियमानुसार एकही काम झाले नसल्याचा दावा सदर युवकांनी केला आहे. मालेगाव पंचायत समितीचे बिडीओ खेडकर व सहाय्यक बीडीओ कंकाळ यांनी सदर घरकुलाच्या फाईल त्यांना मागितल्या होत्या. परंतु त्यानी सदर फाईल गटविकास अधिकारी यांना दिल्या नाहीत व त्या आधीच आपले सामूहिक राजीनामे बिडीओकडे सोपविले. हे विशेष. परंतु त्यांचे राजीनामे मंजूर करण्याआधी आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामांमध्ये किती अनियमितता आहे हे तपासूनच त्यांचे राजीनामे मंजूर करावे व त्यामध्ये दोषी आढळल्यास त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी.
अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे. या राजीनामा दिलेल्या कंत्राटीक अभियंत्यामध्ये ज्ञानदेव ऊके , प्रवीण पारवे, ओम बाजड आणि अनिल आडे या अभियंत्यांचा समावेश आहे. राजीनामे सदर अभियंत्यांनी कोणालाही न विचारता किंवा विश्वासात घेता अचानक पणे गटविकास अधिकारी मालेगाव यांच्याकडे दिले आहेत ? त्यामुळे सदर राजीनामे त्वरित स्वीकृत करून पुन्हा त्यांना कामावर रुजू करून घेऊ नये अशी मागणी सभापती सौ रंजना मधुकर काळे यांनी लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
Users Today : 19