मालेगांव शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर नवोदयची परीक्षा

Khozmaster
1 Min Read

इमरान सैय्यद मालेगांव – इयत्ता सहावीसाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १८ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी तालुक्यातील १४३७ विद्यार्थी शहरातील विविध पाच परीक्षा केंद्रावर ही परीक्षा देणार आहेत.

जिल्ह्यातील इतर तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील परीक्षा केंद्रावर १८ जानेवारी रोजी ही परीक्षा सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे. शहरातील ना.ना. मुंदडा विद्यालय मालेगाव

या परीक्षेच्या केंद्रावर परीक्षा केंद्रप्रमुख मुख्याध्यापक दिनेश उंटवाल विदर्भ पब्लिक स्कूल मालेगाव या परीक्षा केंद्रावर प्रा.गणेश आल्हाट, बाल शिवाजी मराठी विद्यानिकेतन या परीक्षा केंद्रावर प्रा. प्रशांत देशमुख, हॅपी फेसस स्कूल या परीक्षा केंद्रावर ममता जोशी, सनराइज इंग्लिश स्कूल परीक्षा केंद्रावर शुभम शिंदे हे परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. या परीक्षेसाठी यासाठी जवाहर नेहरू नवोदय व शाळा प्रशासन व गटशिक्षणाधिकारी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून येथे १८ जानेवारी रोजी तालुक्यातील १४३७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शहरातील विविध शाळेच्या पाच परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन मालेगाव गटशिक्षणाधिकारी गजानन परांडे यांनी केले आहे.

0 9 5 0 7 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *