चिखली तालुक्यातील प्रलंबित सिंचन विहिरी व गोठ्यांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरात द्या अशी मागणी यावेळी तुपकरांनी केली

Khozmaster
4 Min Read

चिखली :-  ( तालुका प्रतिनिधी )
चिखली तालुक्यातील सिंचन विहिर अनुदान घोटाळा व शेतकऱ्यांच्या आर्थिक लूटप्रकरणी आवाज उठविल्यानंतर शेतकऱ्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर हे चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खरात यांची भेट घेऊन त्यांना चांगलाच जाब विचारला. यावेळी त्यांनी चिखली पंचायत समितीतील विहिर वाटपातील अनागोंदीचा पाढाच वाचला. चिखली तालुक्यातील प्रलंबित सिंचन विहिरी व गोठ्यांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरात द्या, अन्नत्याग आंदोलनातील लेखी आश्वासनांची पूर्तता करा, अशी मागणी यावेळी तुपकरांनी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत, याप्रश्नी शेतकरीहिताच्या निर्णयाची अमलबजावणी करू, अशी ग्वाही सीईओ खरात यांनी दिली. जो अधिकारी पैसे मागत असेल त्याला जागीच चोप द्या. नाही तर त्यांचे नाव मला सांगा तो कुणीही का असेना मी त्याला चोप देईल, अशा शब्दांत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला.सविस्तर असे, की चिखली पंचायत समितीमधील सिंचन विहीर व इतर लाभांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. जो गटविकास अधिकारी येतो खुर्चीवर बसतो मनमर्जी काम करतो आणि निघून जातो. परंतु, सर्वसामान्य शेतकरीवर्गाची सिंचन विहीर व गोठ्यांसाठीची हेळसांड थांबत नसल्याने या प्रकरणी मुद्दामहून अनुदानीत सिंचन विहिरीतून वंचित ठेवले जात असल्याने चिखली तालुक्यातील एकसुद्धा विहीर मंजूर नाही अशा भोरसा भोरसी, तेल्हारा, पेठ, आमखेड, गोदरी यासह दिवठाणा व इतर गावांतील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भेट घेतली. सिंचन विहीर मंजुरासाठी होत असलेली आर्थिक लूट, सतत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक व बिडीओ यांच्या मनमानी कारभाराचा पाढाच तुपकर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी वाचला. तुपकरांनी या प्रकरणी तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खरात यांची भेट घेत, चिखली पंचायत समितीअंतर्गत मग्रारूह योजनेतील प्रलंबित विहीर, गोठ्यांच्या प्रस्तावांना मंजुरात देण्यात यावी, ज्या गावांमध्ये सिंचन विहीर झाली नाही, अशा गावांतील प्रलंबित प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी, रखडलेले घरकुल अनुदान (हप्ते) वाटप करण्यात यावे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी, अशी मागणी तुपकरांनी केली. त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी श्री पायघन कशा प्रकारे तोंड बघून काम करीत आहेत, याचा पाढा पुराव्यासह श्री खरात यांच्यासमोर शेतकऱ्यांनी वाचला. तर मनमानी कारभार न करता शेतकरीहिताच्या दृष्टीने काम करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांला चिखलीचा प्रभार देण्यात यावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

शेतकरी नेते नितीन राजपूत यांनी गट विकास अधिकारी पायघन यांच्या कारभाराविरोधात दिलेल्या तक्रारीवर चौकशी तर करुच त्याचप्रमाणे मागण्यांच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करु, असे अश्वासनदेखील झेडपीचे सीईओ श्री खरात यांनी दिले. शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी बघता जिल्हा परिषद कार्यालय खडबडून जागे झाले होते.

यावेळी शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भगवानराव मोरे, गोपाल ढोरे, अमोल मोरे, दत्ता जेऊधाले, गणेश गारोळे, औचितराव वाघमारे, विठ्ठल चौथे, गणेश देशमुख, संतोष कुटे, पवन शेळके, सरदार सिंह इंगळे, गजानन शेळके, सुरेश कदम, संतोष रोडगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खरात यांनी दिले. तसेच, शेतकऱ्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी, त्यांच्यावर कारवाई करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे, चिखली तालुक्यातील सिंचन विहिरींसाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात आहेत, तोंड पाहून विहिरींचे वाटप केले जात आहे . त्यानंतर शेतकरी व शेतकरी नेते रविकांत तुपकर हे चांगलेच आक्रमक झाल्याने त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन गाठून शेतकरीप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सीईओंच्या दालनात ठिय्या आंदोलनही केले. परंतु, सीईओंच्या कारवाईच्या ठोस आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

0 9 5 0 7 4
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *