बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी जवळील जंगलात आढळून आला सांगडा

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा :- ( शाहिद शहा )
बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी जवळील जंगलात एका अज्ञात पुरुष जातीचा सांगडा आढळून आला. ही घटना (दि.16) जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलीसांना मिळाताच घटनास्थळ गाठुन तपास केला. यानंतर फॉरेन्सिक टीमला बोलावून तेथील नमुने डीएनए साठी घेतले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. बुलढाणा शहराला लागून असलेल्या म्हाडा कॉलनीत दररोज काही न काही घटना घडत आहेत. (दि.10) जानेवारीला या परिसरात बिबट्या दिसून आला होता. यामुळे या कॉलनीतील नागरी भयभीत झाले आहे. तर (दि.15) जानेवारीची याच कॉलनीत राहणारे संदिप वानखडे यांच्या घरात चोरट्यांनी 1 लाखाची चोरी केली. ही घटना ताजी असतांना  (दि. 16) जानेवारी रोजी म्हाडा कॉलनी नजीकच्या जंगलात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पुरुष जातीचा सांगडा आढळून आला आहे. वनविभागाच्या वनमजुरांना हा सांगडा आढळून आला. या घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचा समक्ष पंचनामा करून पुरुष जातीचे कपडे आढळून आल्याने हा सांगडा पुरुष जातीचा असल्याचा अंदाज तर सांगडा जप्त करून नमुने घेत डीएनएसाठी घेतले. अशी माहिती शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांनी दिली आहे. ही बातमी शहरात पसरताच शहरतील नागरीकांनी म्हाडा कॉलनी जवळील जंगलाकडे धाव घेत गर्दी केली होती. सतत होत असलेल्या घटनेमुळे म्हाडा कॉलनी परिसरात भितीचे वातावरण आहे

0 9 5 0 7 4
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *