देऊळगाव राजा नगर परिषदेमार्फत प्रजासत्ताक दिनी सूरू होणाऱ्या अभ्यासिकेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा :- मुख्याधिकारी अरुण मोकळ

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा/तालुका प्रतिनिधी

देऊळगाव राजा येथील गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा मधून शासकिय व निमशासकीय कार्यालयात उच्च पदावर
नोकरी करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देऊळगाव राजा नगर परिषदेमार्फत शहराच्या मध्यवर्ती भागात चिखली महामार्गावरील
डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मोफत अभ्यासिका येत्या 26 जानेवारी पासून सुरू
कऱण्यात येत आहे,या मोफत अभ्यासिके तस्पर्धा परिक्षेकरीता आवश्यक विविध क्षेत्रातील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनापासून सुरू होत असलेल्या अभ्यासिकेत प्रवेश निश्चित करण्यासाठी जास्तीत जास्त गरजू व अभ्यासू
विद्यार्थ्यांनी आपली नावे नगर परिषदेमध्ये नोंदवावी असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांनी केले आहे

0 9 5 0 7 4
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *