युवक वर्गात वाढलेली व्यसनाधिनता ही दिवसेंदिवस वाढलेली आहे

Khozmaster
3 Min Read
बुलडाणा 🙁 शाहिद शहा )   
         युवक वर्गात वाढलेली व्यसनाधिनता ही दिवसेंदिवस वाढलेली दिसुन येत आहे, यामधून युवा पिढी बाहेर पडावी यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी गांजा व इतर तत्सम अंमली पदार्थाचे उत्पादन, साठवणूक तसेच वाहतुक व विक्री करणाऱ्यावर अंकुश लावण्यासाठी अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम (N.D.P.S.) कायद्याखाली धडक कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपोअ. अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोनि अशोक लांडे स्था.गु.शा. बुलडाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार केले असुन सदर पथकांनी गांजा व ईतर अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांचा शोध घेत त्यांचेवर कायदेशीर कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.
        १६ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पो.स्टे. बिबी हद्दीतील देऊळगांव कोळ परिसरात मोटार सायकलवर गांजा या (अंमली पदार्थ) ची चोरटी वाहतूक करीत असल्याचे गोपनीय माहिती मिळाली होती. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देऊळगांव कोळ पसिरात सापळा रचला असता यामध्ये एमएच-२८-बीपी-८३८७ क्रमांकाच्या दुचाकीवर ट्रीपलसीट  तीन जणांना गांजाची चोरटी वाहतूक  करतांना आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
       यावेळी शेख ईस्माईल शेख मोहम्मद (४१) रा. सुलतानपुर तालुका लोणार, जावेद खान हमीद खान (३७) रा. मिल्लत कॉलनी खामगांव ता. खामगांव, तर शहेबाज खान एजाज खान (३०) रा. जुना स्प्रेड खामगांव, तालुका खामगांव यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी आरोपीकडून १० किलो ३०० ग्रॅम जप्त करण्यात आला असुन किंमत १ लाख, ५४ हजार, ५०० रुपये, मोटार सायकल १, किंमत अंदोज ५० हजार, एक मोबाईल किंमत १० हजार रुपये असा एकूण २ लाख १४ हजार ५०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
        या अंमली पदार्थ्यांच्या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी याचे विरुध्द पो.स्टे. बिबी येथे एन.डी.पी.एस. अॅक्टचे कलम ८ (क), २० (ब), (ii) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येत असून इतर फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. बिबी हे करीत आहे.
 
       सदरची कार्यवाही विश्व पानसरे जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा, अशोक थोरात अपोअ खामगांव, बी.बी महामुनी- अ.पो.अ. बुलडाणा यांचे आदेशाने प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि अशोक एन. लांडे यांचे नेतृत्वात, सपोनि संजय मातोंडकर, पोहेकॉ. शेख चाँद, पोना युवराज राठोड, पोकों विजय सोनोने, गोपाल तारुळकर, ऋषीकेश थुट्टे, मपोकां आशा मोरे, चापोकों राहूल बोर्ड स्था.गु.शा. बुलडाणा, पोहे कॉ. राजू आडवे, पोकॉ. खंडेराव – तांत्रीक विष्लेषण विभाग बुलडाणा यांनी केली.
0 9 5 0 7 4
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *