जानेफळः ( विशेष प्रतिनिधी )
जानेफळ पोलिस स्टेशन अंतर्गत थार खुदनापुर येथे १५ जानेवारी रोजी दुपारी दोन चोरांनी खुदनापुर येथील श्री शंकर महादेव यांच्या मंदिरातील त्रिशुळ आणि घंटा चोरी करुन निघून जात असतांना जवळच्या शेतात काम करतांना एकाच्या लक्षात आले असता त्याने मंदिरात जाऊन पाहाणी केली.
यावेही त्रिशुळ चोरी गेल्याचे समजले तेव्हा ते चोर आडमागनि शेतातून जोरात पायी चालत होते. सदरच्या मुलाने त्याला आवाज दिला असता ते पळायला लागले आणि त्रिशूळ व घंटा एका पिशवीत रोड जवळच्या तुरीच्या शेतात ठेवून पळायला लागले व चोरांनी त्यांचा एक साथीदार याला मोटरसायकल रोडवर बोलावून मंगरूळकडे सुसाट निघाले. तोपर्यंत ज्याने चोराचा पाठलाग करतांना गावात फोन करून त्रिशुळ चोरीची कल्पना दिली.
त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी मोटरसायकल घेऊन त्यांचा पाठलाग केला असता सावरखेडच्या बस स्टॉप अडवून ३ चोरांना खुदनापुर तेथे घेऊन आले. जानेफळ पोलिस स्टेशनला घटनेबद्दल माहिती दिल्या असता पोलीसांनी गावात हजर होत चोरट्यांना आपल्या ताब्यात घेतले.
बामध्ये उमेश रमेश मोरे वय २४ बर्ष, महेश रमेश मोरे वय २२ वर्ष तसेच अल्पवयीन बालक नामे चेतन गणेश सोनवणे सर्व राहणार मिलिंद नगर मेहकर यांना ताब्यात घेतले. उपरोक्त दोन आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक केली असून, अल्पवयीन बालकास बाल न्याय मंडळ येथे हजर केले.