मेहकर:-(तालुका प्रतिनिधी)
महाराष्ट्रतील ग्रामीण भागात विविध लोककला सादर करून सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या तमाम असंगठीत लोककारांनी कलावंत म्हणून आपली ओळख शासन दरबारी दखल घेऊन नोंद व्हावी यासाठी “कलावंत तितुका मेळवावा..कला धर्म वाढवावा..”असे आवाहन लोककलावंत प्रबोधन परिषद,महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक तथा कोषाध्यक्ष प्रा.गजेंद्र गवई यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी येथे आयोजित स्थानिक कलावंत जाणीव जागृती.. चेतना कार्यक्रमात व्यक्त केले.लोककलावंत प्रबोधन परिषद,महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी कलावंत शिखर संघटनेच्या वतीने मौजे तांदुळवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मारोती मंदिरासमोर स्थानीक लोककलावंत जाणीव जागृती चेतना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समिती चे माजी अध्यक्ष आत्माराम बुंधे होते तर प्रमुख मार्गदर्शक लोप्रपचे राज्य समन्वयक प्रा.गजेंद्र गवई,शाहीर राहुल जाधव,धनंजय गवई यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमाचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाचे संयोजक शाहीर उत्तम जाधव यांनी प्रास्ताविक करुन स्थानिक लोककलावंत यांनी गावागावात एकसंघ होऊन संघटित झाले पाहिजे असे आवाहन करुन गाव तिथे ग्राम शाखा स्थापना करुन आपले कलावंत म्हणून अस्तित्व सिद्ध करावे असे मत व्यक्त केले.
लोप्रप चे राज्य समन्वयक प्रा.गजेंद्र गवई यांनी राज्यस्तरीय असणाऱ्या लोककलावंत प्रबोधन परिषद,म.रा.या संघटनेचे ध्येय,उद्दिष्टे,कार्य याची सविस्तर माहिती देऊन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावातील स्थानिक सर्व लोककलावंत,गायक, वादक,नकलाकार,महिला पुरुष,युवक,युवती जे स्वतःला कलावंत म्हणून जगत आहेत त्या सर्वांनी संघटनेमध्ये रीतसर सभासदत्व स्वीकारुन आपल्या न्याय हक्काच्या संविधानिक लढ्यात सहभागी व्हावे असे विचार व्यक्त केले..
याप्रसंगी प्रकाश बुधे,सिद्धेश्वर बुंधे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी सिंधू झिने, लंका जाधव,माया जाधव, सुनिता जाधव,कुसुम जाधव,कडुबा जाधव, डिगाबंर जाधव,मधुकर अंभोरे,पंढरी टेकाळे,श्याम बुंधे,सुभाष बुंधे,दिनकर बुंधे,गजानन बुंधे,गजानन भगत, देविदास बुंधे यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार शाहीर उत्तम जाधव यांनी मानले, कार्यक्रमास बहुसंख्येने स्थानिक महिला पुरुष लोककलावंत, गावकरी उपस्थित होते.
Users Today : 22