जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उकळी सुकळी येथे सावंत गुरुजी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Khozmaster
2 Min Read
आज दिनांक१८ जानेवारी २०२५वार शनिवार सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्था, जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उकळी सुकळी यांचे संस्था अध्यक्ष सन्माननीय सावंत गुरुजी यांचा वाढदिवस जगदंबा विद्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान  सावंत गुरुजी यांचे गुरुजी आदरणीय बोरकर सर यांनी स्वीकारले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी शिक्षणाधिकारी तायडे साहेब, शेळके सर, केंद्राध्यक्ष उकळी, वाघ सर केंद्राध्यक्ष चिंचोली बोरे, डी एस भाऊ सावंत  कृषी अधिकारी, डिगांबर भाऊ सावंत उपाध्यक्ष, श्रीकांत भाऊ सावंत सचिव तसेच सर्व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजेसावंत गुरुजी यांच्या जीवनपटावरील त्यांनी स्वतः लिहिलेले. जीवनगाथा या पुस्तकाचा अनावरण करण्यात आल. पुस्तकाचे लेखक सन्माननीय सावंत गुरुजी यांनी त्या ब्रम्हांडनायकाची ही आज्ञा आहे म्हणून मी हे पुस्तक लिहिलं असे हे आपल्या पुस्तकाच्या अनावरणाच्या वेळी आणि वाढदिवसाच्या अवचित साधून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक रहाटे सर यांनी केले. कार्यक्रमाचा संचालन राम सावंत सर यांनी केले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक वाघमारे सरांनी केले. शुभेच्छा पर भाषणामध्ये शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री. जी.एस.ओव्हर सर यांनी आदरणीय सावंत गुरुजी यांच्या मार्गदर्शनात बाबत सांगितले आणि त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन श्री डी एस शिंगणे  सर, श्री शाम भराड तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊच वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
0 9 5 0 7 7
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *