बुलढाणा :- ( जिल्हा प्रतिनिधी )
नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरीच्या ऐतिहासिक पुलावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी बुधवार, दि. १५ जानेवारीरोजी हा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीपल्स रिपब्लिक पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांचेसह कार्याध्यक्ष जयदीप कवाडे व जिल्ह्यातील महायुतीच्या मंत्री तसेच आमदारांना निमंत्रित केले होते. मात्र एकाही मंत्री व आमदाराने हजेरी न लावता पाठ दाखवली. मात्र पूर्व नियोजित निमंत्रित नसतानादेखील आमदार सिद्धार्थ खरात यांनी केवळ फोनवर या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे, यासाठी १९७८ मध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वात नागपूरवरून लॉग मार्च काढण्यात आला. हा लाँग मार्च औरंगाबादकडे जात असताना सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरीच्या पुलावर प्रशासनाने अडविला. तेव्हा खूप संघर्ष करावा लागला. सतरा वर्षानंतर नामांतर जरी झाले नसले तरी नामविस्तार मात्र झाला. तेव्हापासून नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी या पुलावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने भव्य नामांतर स्मृती सोहळा दरवर्षीच आयोजित करण्यात येतो. याहीवर्षी तो बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील महायुती सरकारमधील केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव, कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर, आ श्वेताताई महाले चिखली, आ. संजय कुटे जळगाव जामोद, आ. मनोज कायंदे सिंदखेडराजा, आ. संजय गायकवाड बुलढाणा यांच्यासह महायुतीतील पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते, मात्र उपरोक्त आमदारांपैकी एकाही आमदाराची व मंत्र्याची नामांतर स्मृती सोहळ्याला शहिदांना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती नव्हती. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थिततांमध्ये उलट-सुलट चर्चा होती. तत्पूर्वी सकाळी प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी आ. सिद्धार्थ खरात यांच्याशी येण्यासंदर्भात फोनवर चर्चा केली. त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव भीमसैनिक आ. सिद्धार्थ खरात हे (पोस्टरवर फोटो किंवा नाव नव्हते तरी पण) निमंत्रित नसतानादेखील शहिदाप्रती सहानुभूती दाखवून उपस्थित झाले व शहिदांना अभिवादन करून समाजाप्रती त्यांनी एक प्रकारे ऋण जोपासले. याप्रसंगी आ. सिद्धार्थ खरात यांनी मनोगत व्यक्त करताना नागपूरवरून १९७८ मध्ये निघालेला लॉन्ग मार्च राहेरी पुलावर अडविला व येथे आम्ही जगू किंवा मरु असा संघर्ष या भूमीत झाला. यामध्ये परिसरातील लोकांनी त्यावेळेस खूप सहकार्य करून सहभाग नोंदवला. त्यामध्ये आपलाही सहभाग होता. येथील स्तभ हा क्रांतीचा आहे. मी प्रशासनात असतांना मला काही करता येत नव्हते. पण आता मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे यापुढचा लढा हा रस्त्यावरचा नसून विचाराचा आहे. आपण आदेश द्यावा, समाजाच्या उन्नतीसाठी मी काम करणार आहे. सामाजिक कार्यासाठी पक्ष नसतो. यावर्षीच नव्हे तर या अगोदरही दरवर्षी मी या ठिकाणी शहिदांना अभिवादन करण्यासाठी येत होतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख मार्गदर्शनात प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी अनेकदा आपण येथे येतो. पण जमीन दिसते, स्मारक उभे राहत नाही. बेईमानीतून नव्हे तर बाबासाहेबांच्या भीमसैनीकाच्या घामातील पैशातून झाले पाहिजे ही माझा इच्छा होती. त्यामुळे आज आपण येथे शोर्यस्तंभाचे भूमिपूजन केले. भीमाकोरेगावचा आदर्श घेवून मी विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी लॉगमार्च काढला. मोठा संघर्ष करत अनेक भीमसैनीक शहीद झाले. त्यांच्या बलीदानामुळेच नामांतर झाले. त्या नामांतराच्या शौर्य व बलीदान दिलेल्या भीमसैनीकांना अभिवादन करण्यासाठी आपण येत असतो. आपण कोणावर अन्याय करायचा नाही पण जे अन्याय करतील, त्याची तक्रार न करता प्रतिकार करावा. आता आम्ही यापुढे अन्याय सहन करणार नाही. या स्मारकासाठी सर्वांनी दान द्यावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. याप्रसंगी जयदीप कवाडे, चरणदास इंगोले यांनीही आपले विचार मांडले. यावेळी उपरोक्त मान्यवरांच्याहस्ते शौर्य स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले.
वास्तविक पाहता पीपल्स रिपब्लिकन पार्टीची शिवसेना शिंदे गटाशी युती आहे, म्हणजेच ते महायुतीत सहभागी आहेत. असे असताना व निमंत्रित असतानादेखील महायुतीचा मंत्री किंवा एकही आमदार या सोहळ्यासाठी आला नाही. दुसरीकडे मात्र मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात हे पूर्व नियोजित निमंत्रित नसताना (पोस्टरवर फोटो किंवा नाव नव्हते तरी पण) सुद्धा वेळेवर केलेल्या फोनवर स्मृतिस्थळावर शहिदांना अभिवादन करण्यासाठी आले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी विविध उलट-सुलट चर्चा उपस्थितांमध्ये ऐकायला मिळत होत्या. यानिमित्ताने पुन्हा एकदा आ. सिद्धार्थ खरात यांच्यात समाजाप्रती असलेली तळमळ आणि आंबडेकरी चळवळ जिवंत असलेला सच्चापाईक अशी सहानुभूती उपस्थित भीमसैनिक बंधू भगिनीमध्ये चर्चेचे माध्यमातून ऐकायला मिळाली.
निमंत्रित मंत्र्यांसह आमदारांची नामांतर स्मृतीसोहळ्याकडे पाठ ! केवळ फोनवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली…
0
9
5
0
7
7
Users Today : 25
Leave a comment