स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकअनुषंगाने सर्व शिवसैनिकांनी कंबर कसून सज्ज रहावे : ना. प्रतापराव जाधव.

Khozmaster
2 Min Read

मलकापूर 🙁  तालुक प्रतिनिधी )
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अनुषंगाने सर्व शिवसैनिकांनी कंबर कसून सज्ज रहावे असे आवाहन केंद्रीय आयुष्य तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी १९ जानेवारी रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित मलकापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन प्रसंगी केले.
प्रारंभी बाजार समितीच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत ना. प्रतापराव जाधव यांचा बाजार समितीच्या वतीने सभापती संजय काजळे तर शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख विजय साठे यांनी यथोचित सत्कार केला. तर पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रघुनाथ फोफसे यांनी सुद्धा नामदार जाधव यांचा सत्कार केला याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ना. जाधव यांनी शिवसेना ही हिंदुत्व व मराठी माणसाकरिता लढणारी संघटना असून आजही ८० टक्के
समाजकारण तर २० टक्के राजकारण ध्येयधोरणावर शिवसैनिक मार्गक्रमन करीत आहे. येणारा काळ हा निवडणुकीचा काळ असून शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा डौलाने कसा फडकेल या दृष्टीने नियोजन करीत पदाधिकाऱ्यांनी त्या धर्तीवर आतापासून कंबर कसीत सज्ज राहिले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शांताराम दाणे, जिल्हा उपप्रमुख संतोष डीवरे, नांदुरा तालुका प्रमुख सुनील जुनारे, शहर प्रमुख अनिल जांगडे, मलकापूर कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे, विनायक जवरे, ओंकारसिंग डाबेराव, अनंता गायगोळ, संभाजी सहावे, विनायक बोरसे, गजानन धाडे, रामेश्वर धोरण, ज्ञानेश्वर इंगळे, सुरेश अहिर आदी पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दरम्यान बाजार समितीचे सभापती संजय काजळे यांचा सुद्धा नामदार प्रतापराव जाधव यांनी यथोचित सत्कार करीत बाजार समितीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या बैठकीला मलकापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बाजार समितीच्या वतीने ना. प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चैनसुख संचेती, बाजार समिती सभापती संजय काजळे, संचालक साहेबराव पाटील, ज्ञानदेव वाघोदे, भगवान पाटील, विजय साठे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश संचेती, शंकरराव पाटील सुनील अग्रवाल, रामभाऊ झांबरे, वाकोडीचे सरपंच शुभम काजळे, योगेश काजळे, बाजार समिती सचिव भगवान जाधव तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 9 5 0 7 7
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *