दोन महिन्यात सीसीआय कडून तालुक्यात १२२ कोटी रुपयांच्या वर पांढऱ्या सोन्याची खरेदी

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा:-  ( विशेष प्रतिनिधी )
भारत सरकारच्या वतीने देऊळगावराजा तालुक्यात सहा ठिकाणी सीसीआय मार्फत शेतकऱ्यांनी पिकवलेले पांढरे सोने खरेदीची प्रक्रिया दिनांक आठ नोव्हेंबर २४ पासून सुरू आहे ८ नोव्हेंबर ते १० जानेवारी या कालावधीत एक लाख ६५ हजार किंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी केली असून खाजगी कापूस खरेदीदारापेक्षा जास्त दराने भारत सरकार शेतकऱ्यांचा पांढऱ्या सोन्याला भाव देत असून ७४०० प्रमाणे जवळपास १२२ कोटी रुपयांचे सीसीआयने पांढरे सोने खरेदी पोटी शेतकऱ्यांना वितरीत केले आहे खरेदी प्रक्रिया पारदर्शक असून शेतकऱ्यांचा सातबारा व आधार कार्ड व बँकेचे पासबुकचा ताळमेळ लागला की शेतकऱ्यांनी विकलेल्या पांढऱ्या सोन्या चे पैसे पाच दिवसात शेतकऱ्यांचे खात्यात जमा होत आहे तर शेतकऱ्यांना टोकन देण्याची जबाबदारी बाजार समितीकडे आहे बाजार समिती यार्डात जास्त कापूस आल्यास काही शेतकऱ्यांना टोकन साठी आर्थिक झळ सोसावी लागत असल्याची ओरड एकाव्यास मिळाली भारत सरकारच्या वतीने सीसीआयने खरेदीसाठी पुढाकार घेतला असला तरी नियोजन करण्यामध्ये या विभागाचे अधिकारी मागे पडले आहे कारण ११ जानेवारीपासून या ठिकाणच्या सहाही खरेदी केंद्रावर पांढऱ्या सोन्याची खरेदी बंद करण्यात आलेली आहे खरेदी बंद बाबत सीसीआयचे येथील प्रतनिर्देशक यांचे कडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की कापूस खरेदीनंतर त्यावर प्रक्रिया करून तयार झालेल्या कापसाच्या गठाणी ठेवण्यासाठी तूर्त पुरेसे गोदाम उपलब्ध नसल्याने आम्ही कापूस खरेदी काही दिवसाकरीता बंद केलेली आहे सीसीआयने खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच खरेदीचा अंदाज घेत तयार झालेल्या गठानी ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते मात्र काही काळ खरेदी बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे एवढे मात्र खरे.

0 9 5 0 7 7
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *