रेती तस्करांच्या १५ बोटी उद्ध्वस्त

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा : ( विशेष प्रतिनिधी ) सिंदखेडराजा व बुलडाणा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने जिल्हास्तरीय शोध पथकाच्या साहाय्याने रेती तस्करीविरुद्ध   २२ जानेवारी रोजी मोठी कारवाई केली.
महसूल विभागाच्या पथकाने सिनगाव जहागीर भागात रेती तस्करांच्या दोन बोटी, इसरूळ व बायगाव शिवारात एक बोट अशा तीन बोटी जिलेटिनच्या साहाय्याने उडविण्यात आल्या. या दरम्यान शिनगाव येथे बोटीत तीन मजूर सापडले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जाफ्राबादच्या तहसीलदारांशी पथकातील अधिकाऱ्यांनी सकाळपासून संपर्क करून त्यांच्या भागात गेलेल्या सहा बोटींसोबत सहा छोट्या बोटी अशा एकूण बारा बोटी त्यांनी त्यांच्या भागात पकडल्या. त्या बोटीसुद्धा जिलेटीनने उडविण्यात आल्या. या कारवाईत बुलडाणा जिल्ह्यात तीन व जाफ्राबाद तालुक्यात १२ अशा एकूण १५ बोटींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत देऊळगावराजा व चिखलीचे तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचारी पथकांचा समावेश होता. या कारवाईसाठी पोलीस विभागाने सहकार्य केले. शोध पथक व ड्रोन कॅमेरा यांच्यामुळे ही कारवाई यशस्वी झाली.

0 9 5 0 7 8
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *