बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची व्यापक जनजागृती करावी

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा 🙁 विशेष प्रतिनिधी )   
जिल्ह्यातील मुलीचा जन्मदराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. गर्भलिंग निदान, तपासणी, कन्याभ्रूण हत्या, बालविवाह यासारख्या अनिष्ठ प्रथांना आळा घालण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज, २२ जानेवारी रोजी’बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या १० वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. विद्यार्थी, महिला शिक्षक सहभागी झाल्या होत्या. सुरवातीला उपस्थितांना ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची शपथ देऊन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सायकल रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरू होऊन कारंजा चौक, बोंडे सरकार चौकमार्गे भारत विद्यालय येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत जिल्हा परिषदचे अधिकारी, कर्मचारी तसेच भारत विद्यालय, प्रबोधनी विद्यालय, शारदा ज्ञानपीठ व एडेड हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. १० वर्षपूर्तीनिमित्त विविध विभागांमार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले यांनी दिली.

0 9 5 0 7 8
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *