खामगांव:- ( शहर प्रतिनिधी )
एकीकडे भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये साजरा केला गेला याचे कारण असे की डॉक्टर बाबासाहेच आंबेडकर यांनी या भारताच संविधान लिहिलं आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान अमलात आणले आणि दुसरीकडे प्रजासत्ताक दिनी पंजाब राज्यातील अमृतसर या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती पुतळ्याला एका युवकाने हातोडे मारले बाबासाहेबांच्या हातामध्ये असलेली संविधानाची प्रतिकृतीला आग लावली या घटनेमुळे संपूर्ण आंबेडकरी समाजामध्ये रोष निर्माण झाला असून सर्वाच्या भावना दुखावल्या गेल्या ज्या बाचासाहेवांमुळे त्यांच्या संविधानामुळे हा देश हुकूमशाही मधून लोकसाहीमध्ये आला आणि आज बाचासाहेव आंबेडकर यांच्या प्रती एवढा द्वेष आणि ही निदनीय घटना प्रजासताक दिनी घडली या घटनेचा भीम आर्मीच्यावतीने आज तीव्र निषेध करत असून आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भीम आर्मी एकता मिशन खामगांव चे पदाधिकारी करीत आहेत. अशा प्रकारचे निवेदन भीम आमर्मी भारत एकता मिशन च्या वतीने मा उपविभागीय अधिकारी खामगांव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बुलडाणा जिल्हा अध्यक्ष प्रकाश भाई धुंदके, अतुल भाई इंगळे, प्रकाश भाई मोरे, बंटी दादा गव्हांदे, आकाश भाई बोरुडे, नरेश भाई वाकोडे, महेंद्र भाई खंडारे, अमर भाई जाधव व भीम आर्मी चे बरेच सदस्य उपस्थित होतो.
Users Today : 27