ओम सोनुने महाराष्ट्र क्रिकेटचा स्टार समालोचक..!

Khozmaster
1 Min Read

क्षेत्र कोणतेही असो, जिद्द आणि चिकाटी असेल तर जीवनात यश मिळतेच. सातत्य, संयम आणि परिश्रम याच्या जोरावर स्थानिक मेहकर तालुक्यातील संवेदनशील गांव म्हणून ओळख असलेले देऊळगांव साखरशा या गावचे सुपुत्र, ओम सोनुने यांनी महाराष्ट्र क्रिकेटचे स्टार प्रचारक म्हणून ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील आमदार खासदार व अनेक मंत्री महोदयांच्या नावाने ठेवल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यामध्ये ओम सोनुने यांचे समालोचन हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचे चाहते निर्माण झालेले आहेत.अशातच महाराष्ट्रातील समालोचनाचा मुद्दा तापला असताना स्पोर्ट्स कडा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील मनसे नेते मा. केतन जी नाईक साहेब यांनी महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींच्या समालोचनाची भूक भागवणारा स्टार समालोचक म्हणून देऊळगाव साखरशा येथील ओम सोनुने यांचा उल्लेख केला आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत टाकत, महाराष्ट्रातील आघाडीचे वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांना आदर्श मानत त्यांनी आपल्या वक्तृत्वाला सुरुवात केली. महाराष्ट्रभर आर. जे. ओम म्हणून ते प्रसिद्ध झाले. दि. १० फेब्रुवारी पासून होऊ घातलेल्या जानेफळ चषक २०२५ साठी ते समालोचक म्हणून येणार असल्यामुळे क्रिकेट प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणाऱ्या भव्य सामन्यांमध्ये विविध राजकीय पक्ष, नेते समलोचक म्हणून ओम सोनुनेला बोलावतात. ओम नसेल तर ते सामने झालेच नाही असे लोकांना वाटते. ही नवीन पिढीच्या समालोचकांची ताकद आहे.

मनसे नेते.. केतनजी नाईक

0 9 5 0 7 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *