बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे लॉन, प्रेक्षक गॅलरी,व डे-नाईट मैदानाचा भूमिपूजन सोहळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमती मितालीजी राज यांच्याहस्ते संपन्न झाला…!

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-( जिल्हा प्रतिनिधी

शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आखाडा बुलढाणाच्या सौजन्याने भव्य धर्मवीर आमदार चषक २०२५ चे आयोजन करण्यात आलेले आहे…!
त्यानिमित्ताने आज दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी *धर्मवीर आमदार चषक टेनिस क्रिकेट अंतिम सामन्यासाठी भारताच्या माजी महिला कर्णधार श्रीमती मितालीजी राज यांचे आगमन झाले होते…!
त्यांचे स्वागत करताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेश पांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,धर्मवीर आखाडा अध्यक्ष तथा धर्मवीर युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, जिल्हा शैल्यचिकित्सक श्री भागवत भुसारी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील, बुलढाणा शहर ठाणेदार श्री नरेंद्र ठाकरे,किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती आशिष जाधव, देशोन्नतीचे जेष्ठ पत्रकार श्री राजेंद्र काळे,सचिन गायकवाड, मल्हारी गायकवाड, विजय दुरणे,पवन भालेराव, नितीन राजपूत, मोहन पऱ्हाड, जीवन उबरहंडे, निलेश पाटील,विजय काळवाघे, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे,वरुण कुलकर्णी,यांच्यासह धर्मवीर आमदार चषक २०२५ चे सर्व आयोजक क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते….!

0 9 5 0 7 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *