बंद घरातून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास…

Khozmaster
1 Min Read
खामगाव :- ( तालुका प्रतिनिधी )

शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच ७ फेब्रुवारी रोजी पुन्हा चोरीची घटना समोर आली आहे. राणा लकी शाळेजवळ समोरील एका बंद घरातून चोरट्यांनी ५ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि १ लाख ३० हजार रुपये नगदी असा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस अधीक्षकांनी भेट देऊन तपासाची दिशा पोलिसांना सांगितली. शहरामध्ये एका घटनेचा तपास सुरू होत नाही तोच दुसऱ्या चोरीचा गुन्हा  घडत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिस मात्र तपास सुरू आहे, असे सांगून हात झटकत असल्याचे चित्र आहे. शहरातील शेगाव रोडवरील राणा लकीजवळ राहणारे आशिष सतीश जैस्वाल (वय २७) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ६ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख १ लाख ३० हजार रुपये असा ५ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत

0 9 5 0 7 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *