छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन

Khozmaster
2 Min Read
नांदुरा  :-(तालुका प्रतिनिधी) 

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदुरा च्या वतीने दरवर्षी गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. युवा पिढीला शिव इतिहासाची माहिती होने व किल्ले बनवून त्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव मिळविणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदुरा च्या वतीने दरवर्षी गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे। आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा समितीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले असून स्पर्धकांनी दिनांक १५ फेब्रुवारी पर्यंत किल्ले बनवून तयार ठेवावेत विशेष म्हणजे हे किल्ले बनवितांना जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा. आधुनिक झगमगाट, कृत्रिम बनावट असलेल्या किल्ल्यांना प्राधान्य देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. या स्पर्धेत स्पर्धकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देण्यात येईल. यात प्रथम बक्षीस ७१००/- द्वितीय बक्षीस ५१००/- व तृतीय बक्षीस ३१००/- रुपये देण्यात येईल. यात शहरासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय व ग्रामीण भागासाठी सुद्धा प्रथम, द्वितीय व तृतीय असे एकूण शहराचे ३ व ग्रामीण भागाचे ३ असे ६ बक्षीस राहणार आहेत. शिवाय इतर स्पर्धकांना सुद्धा सहभाग नोंदविल्या बद्दल सन्मानपत्र देण्यात येईल. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता व संपर्क क्रमांक या स्पर्धेचे पर्यवेक्षक अमर रमेश पाटील यांच्या ९५९५०८६३६६ या व्हॉट्स क्रमांकावर किंव्हा छत्रपती बाळासाहेब धोरण यांच्या ७७१९९१६६३६ या क्रमांकावर पाठवावे व किल्ले तयार झाल्यावर फोन करून कळविणे. यानंतर समिती मार्फत दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पर्यवेक्षक आपल्या किल्ल्याची पाहणी करण्यास येतील व निकाल व बक्षीस वितरण हे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी मोटारसायकल रॅली संपल्यानंतर नांदुरा येथील छत्रपती शिवरायांचे स्मारक यथे मान्यवरांच्या हस्ते वितरित होईल.

0 9 5 0 7 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *