आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांचा आत्मदहनाचा इशारा.. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाईला विलंब का..?

Khozmaster
3 Min Read

कार्यालय,प्रतिनिधी –

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस दलाचे ब्रीद आहे. परंतु मेहकर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाचा सबळ पुरावासह कच्च्याचिठ्ठा उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आला होता. याच अनुषंगाने ठाणेदार भाऊराव घुगे यांची लिखित तक्रार सुद्धा आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी केली होती परंतु अद्याप याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे आठवड्याभरात सदर प्रकरणात उचित कारवाई न झाल्यास अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये टावर वर चढून आंदोलन करणार अथवा मंत्रालया समक्ष आत्मदहन करणार असल्याचे स्मरणपत्र दिनांक 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन हद्दीत गतकाळात सुरू असलेल्या अवैध रेती वसुली, नोटा प्रकरण, भंगार व्यवसायिकांच्या व्यथा संदर्भात आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी सुरू असलेला गौडबंगाल उघडकीस आणण्यासाठी मागील 40 दिवसापासून अविरत लढा देत आहेत. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज संबंधित घटना क्रमामध्ये गुगल मॅपिंगचे फोटोज, त्याचप्रमाणे बनावट नोटा प्रकरणी घडलेला घटनाक्रम सबळ पुराव्यासह लिखित तक्रार अनुक्रमे उपविभागीय पोलीस अधिकारी ,मेहकर जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा पोलीस आयुक्त अमरावती, नामदार गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. सदर प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी चौकशी करून संबंधित अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांच्याकडे मागील आठवड्यात दाखल केला आहे. बनावट नोटा तसेच नोटांच्या पाऊस प्रकरणात मेहकर उपविभागात अनेक गैर कायदेशीर घटना घडल्या आहेत ज्यामध्ये जानेफळ लोणार डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तर गंभीर वाद तसेच निर्गुण हत्या चे प्रकरण सुद्धा अवघड किस यापूर्वी आलेले आहे. असे असताना सुद्धा तेलंगणा स्टेटच्या पासिंग असलेल्या बलेनो कार चालकासह इतर चार आरोपीवर प्रतिबंधक कारवाई करून सोडण्यात येते. हा सगळा प्रकार संशयास्पद आढळून आल्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा नागरिकांमध्ये मलिन होत आहे. सज्जनाचे रक्षण आणि वाईट लोकांना दंडित करणे असे असताना पोलीस विभागाकडून कोणत्या हेतूने अशा लोकांना सोडण्यात आले हा सर्व घटनाक्रम उघडकीस आणून पोलिसांप्रती डगमगत असलेला जनतेचा विश्वास योग्य नाही. पोलीस प्रशासनाप्रती असलेला आदरभाव तसेच समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी एक समाजसेवक म्हणून कार्यरत असलेल्या आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वरील घटनाक्रमामधील गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली आहे.
याप्रकरणी लवकर कारवाई न केल्यास आठवड्याभरात उग्र आंदोलन करण्याचा म्हणजेच मंत्रालया समक्ष आत्मदहन अथवा आयुक्तालय कार्यालयात टावर चढून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी बोरकर यांनी दिला आहे.

0 9 5 0 7 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *