तहसीलदारांचे वसुली मास्टर अडचणीत ! वसुलीचे पुरावे असल्याने अडकले अडकित्त्यात !

Khozmaster
3 Min Read
मलकापूर ;-(  तालुका प्रतिनिधी )

तालुक्यात महसूल विभागाची स्थानिक यंत्रणा बहुचर्चित ठरल्याने विविध घटना व कारनाम्यांनी वेळोवेळी गाजत आहेत. यात आता त्यांच्या विश्वासू शासकीय, खाजगी  चालकाची अवैध वाळू, बायोडिझेल माफीयांच्या सोबत तहसीलदार राहुल तायडे यांचे विश्वासू शासकीय, खाजगी चालक यांचे पराक्रम बाहेर आले आहेत.
अवैध धंदे असलेल्या माफियाच्या सोबत असलेल्या त्यांच्या संबंधाची  चौकशी करण्या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ११ फेब्रुवारी मुन्ना राठोड यांनी तक्रार दाखल केली. या गंभीर तक्रारीने महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 
खासगी चालकही चर्चेत !
या प्रकरणात तहसीलदार राहुल तायडे यांचा खासगी चालक मनोज वानखेडेचा ही तक्रारीत उल्लेख केला आहे. तेही या प्रकरणी वसुली मास्टर म्हणून चर्चेत आले आहेत. खासगी वाहन चालक मनोज वानखेडे आठवड्यात दोन ते तीन ट्रॅक्टर रेती, गाडी करून परस्पर सोडवत आहेत. यामुळे ते देखील या प्रकरणी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

 
तक्रारीत काय ? 
तहसीलदारांचे शासकीय वाहन चालक व खासगी वाहन चालक यांचे वाळू तस्करी व बायोडिझेल माफियांसोबतचे संबंध असल्याचा ‘बॉम्ब’ तक्रारीमधून टाकण्यात आला आहे. तहसीलदार राहुल तायडे यांचे शासकीय चालक दिलीप तायडे यांचे बाळू तस्करांसोबत थेट संबंध आहेत, असा थेट आरोप राठोड यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर या साट्यालोट्याचे अनेक ठोस पुरावेही आहेत. यामध्ये ‘फोन  पे’वरील व्यवहार, हॉटेलवरील पार्टी कॉल रेकॉर्डींग आदी पुराव्यांचा समावेश असून आपल्याकडे हे पुरावे असल्याचे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. दुसरीकडे दिलीप तायडे हे प्रत्येक वाहनांकडून दरमहा दहा हजार रुपये जमा करण्याचे काम करत आहे. त्यामुळे वाळू, मुरूम पकडून १०० ते २०० वाहने, रेशन दुकानदारांच्या वसुलीचे कामही तहसीलदार राहुल तायडे यांचे चालक दिलीप तायडे हे करत आहेत. दिलीप तायडे मलकापूर तहसिलमध्ये १२ ते १५ वर्षांपासून कार्यरत असून, त्यांचे येथील सर्व बाळूतस्कर व बायोडिझेल, रेशन माफीया यांच्याशी हितसंबंध बनलेल आहेत, अशा आशयाची तक्रार उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
 
शासकीय चालकाचा मोबाईल ‘साक्षीदार’ देणार का? 
तहसीलदार राहुल तायडे यांच्या विश्वासू चालक दिलीप तायडे यांचा मोबाईल सांभाव्य चौकशीत महत्वाचा घटक ठरु शकतो. मोबाईलचे सीडीआर, डीव्हीआर रेकॉर्ड काढले तर यामध्ये त्यांचे अनेक माफीयांसोबतचे हित संबंध समोर येणार असल्याचा दावा करण्यात  आला आहे. चालक हा परस्पर रेतीची गाडी ट्रैक्टर पकडतो व ती तिथल्या तिथेच १० ते १५ हजार घेऊन सोडून देतो. चालक दिलीप तायडे यांची ‘बदली झाली असताना अद्यापही मलकापूर येथे कार्यरत कसे’? असा सवाल ही तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे.
0 9 5 0 8 1
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *