स्नेहल संदीप चौधरी, वय अवघे २४ वर्षे. ३ दिवसांपूर्वी दु १२ वा आईसोबत बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकातून स्कुटीवर घरी जात असतांना मद्यधुंद बोलेरो चालकाने पाठीमागून धडक दिल्याने गाडीखाली चिरडून अपघातात स्नेहलचा जागीच मृत्यू झाला. बुलढाणा शहरात आज कॅण्डल मार्च काढून स्नेहलला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दुर्दैवी घटनेने सारे शहर सुन्न झाले आहे. मदयधुंद अवस्थेत गाडी चालवून होणाऱ्या अशा अपघातांमध्ये निष्पाप लोकांचा बळी जातो आणि कायद्यातील पळवटांमुळे गुन्हेगार मात्र जामिनावर सुटून मोकळे होतात. पोलीस प्रशासन आणि परिवहन विभागाने सर्व नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे हा अट्टाहास धरला तर कदाचित अशा घटना आपण टाळू शकतो. यशस्वी आयुष्याचे स्वप्न बघण्याच्या वयात स्नेहल व्यवस्थेची बळी ठरली आहे. प्रशासनाने यात गांभीर्यपूर्वक लक्ष घालुन संबंधित गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सहकार्य केले पाहिजे, जेणेकरून असे अनेक निरपराध लोकं अशा दुर्दैवी घटनेला सामोरे जाणार नाहीत. चौधरी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्नेहलला भावपूर्ण श्रद्धांजली !
Users Today : 30