बुलढाण्यात आज शिवशंभो गर्जना.अभी-अमुचा लाईव्ह कॉन्सर्ट शो शिवशंभु प्रेमींची उत्कंठा शिगेला

Khozmaster
1 Min Read
बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )
 किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक वर्धापन दिन सोहळ्याला प्रचंड गाजलेला “शिवशंभो गर्जना” हा अभी-अमुचा लाईव्ह कॉन्सर्ट शो बुलढाणा येथे आज रविवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता “शिवनेरी” जिजामाता प्रेक्षागाराजवळ होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणाच्या वतीने, “शिवशंभो गर्जना” या अभी-अमुचा लाईव्ह कॉन्सर्ट शो चे आयोजन करण्यात आले आहे. लोकगीते, शिवगीते, गोंधळ, पोवाडे, स्फूर्तीगीते.. ही महाराष्ट्राची लोकधारा आधुनिक रॅप सॉंग मधून सादर होणार आहे. हा लाईव्ह कॉन्सर्ट शो सध्या महाराष्ट्रात संगीत क्षेत्रात धुमाकूळ घालत असून, या “शिवशंभो गर्जना” साठी तमाम शिव शंभु प्रेमींची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. महिलांची बसण्याची स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त शिवप्रेमी उपस्थित राहावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 9 5 0 8 7
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *