सिंदखेडराजा तालुक्यातून जाणाऱ्या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर ३२३ वर रेतीतस्करांकडून बॅरिगेट तोडून अवैध रेतीची खुलेआम वाहतूक सुरू आहे. सदर वाहतूक १४ टिप्परद्वारे सुरू असून, महामार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून या वाहनांवर महामार्ग पोलिसांसह पोलिस व महसूल पथक कारवाई करतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक प्रकारामुळे अतिशय वेगात जाणारी वाहने पाहता, भविष्यात भीषण दुर्घटना होण्याची शक्यता असून, महसूल व पोलिस प्रशासन एखादा भीषण अपघात होण्याची वाट पाहात आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
सविस्तर असे, की मुंबई ते नागपूर या हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर ३२३ वरून अवैध रेतीतस्करांकडून खडकपूर्णा नदीपात्रातील रेतीची खुलेआम वाहतूक सुरू आहे, व मेहकर टोल नाक्यामागे पुन्हा बॅरिगेट तोडून येथून खाली उतरत सदर वाहतूक मेहकर तालुक्यात अवैधरितीने केली जात आहे. अवैध रेती वाहतूक करण्यासाठी तयार केलेला रस्ता बंद करण्यासाठी समृद्धी महामार्ग पोलीसांनी एमएसआरडीसीसोबत पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु, या अधिकाऱ्यांनी अद्याप तो बंद केला नसल्याचे दिसून येते. या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. महसूल विभागाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हे समृध्दी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून अवैध रेती वाहतूक करणाच्या टिप्परवर कारवाई करतील का, व बॅरिकेट तोडून येथून सुरू असलेली अवैध रेती वाहतूक बंद करतील का? असा सवाल जनमाणसातून उपस्थित होत आहे.
वाळूतस्कर समृद्धी महामार्गावरील वेगवान वाहतुकीच्याही जीवावर उठले; मेहकरनजीक बॅरिगेटस तोडून अवैध रेतीवाहतूक सुरू !
सिंदखेडराजा 🙁 तालुका प्रतिनिधी )
0
9
5
0
8
7
Users Today : 35
Leave a comment