समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारमध्ये जळून दोघांचा कोळसा !

Khozmaster
3 Min Read
सिंदखेडराजा 🙁 तालुका प्रतिनिधी )

मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर आज (दि.२०) झालेल्या भीषण अपघातात मुंबईच्या दोन प्रवाशांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. आज सकाळी ९ वाजता दुसरबीड टोलनाकाजवळ ही भीषण दुर्घटना घडली. कार क्रमांक एमएच ०४ एलबी ३१०९ मुंबईवरून अकोल्याच्या दिशेने जात होती. दरम्यान, चॅनेल क्रमांक ३१८.८ वर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार मीडियनमधील कॅश बॅरिअरला धडकली आणि बॅरिअरची लोखंडी पट्टी कारच्या समोरून घुसून मागील बाजूने बाहेर पडली. यानंतर कारने पेट घेतला. या अपघातात गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) आणि राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२), दोघेही रा मुंबई यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरबीडजवळील टोलनाक्यापासून ५०० मीटर अंतरावर हुंडाई आय टेन कारचा हा भीषण तितकाच थरारक अपघात घडला आहे. त्यात एक प्रवासी अत्यवस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर कार मुंबईतहून अकोल्याच्या दिशेने जात असताना चॅनेज क्रमांक ३१८.८ जवळ नागपूर कॅरिडोरवर चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय ३५, रा.मुंबई) यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार मिडीयममधील क्रॅश बौरेअरला धडकून सदर बॅरिअरची पट्टी कारच्या समोरील भागातून घुसून आरपार पाठीमागून निघाली व कारने तात्काळ पेट घेतला. यामध्ये अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) व राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२) दोन्ही रा. मुंबई यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला, व चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय ३५) हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ महामार्ग अॅम्बुलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे, डॉक्टर यासीन शहा, चालक दिगंबर शिंदे यांनी तात्काळ सदर जखमीला बिबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार कामी घेऊन गेले व दोन्ही मृत पावलेले व्यक्ती यांना ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे ठेवण्यात आले असून, सदर मृतक यांचे नातेवाईक यांच्या यांच्याशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येत आहे.अपघात घडला त्यावेळी तात्काळ समृद्धी महामार्ग क्यूआरव्ही टीम व महामार्ग पोलिसचे पीएसआय गजानन उज्जैनकर, शैलेश पवार, पोहेकॉ विठ्ठल काळुसे, मुकेश जाधव, संतोष वनवे, संदीप किरके, अरूण भुतेकर व एम एस एफ स्टॉप यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सदर मृतदेह जळालेल्या कारमधून बाहेर काढले व सदर ठिकाणी तात्काळ किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरवाडे व देऊळगावराजा उपविभागाच्या उपविभागीय पोलिस अधकिारी मनिषा कदम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही सुरू केली होती. अपघातग्रस्त कार क्रेनच्या साह्याने मिडीयममध्ये लावून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

0 9 5 0 8 6
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *