चिखली 🙁 तालुका प्रतिनिधी )
चिखलीच्या लोकप्रिय तथा सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करणाऱ्या आमदार श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांना जे धमकीचे पोस्टाद्वारे पत्र आले आहे, त्यातील भाषा अतिशय गंभीरस्वरूपाची व अश्लाघ्य आहे. एका पाकिटात श्वेताताईंना एकूण तीन पत्रे आलीत, त्यात नमूद आहे, की “तू आमची घरे, पानटपऱ्या, दुकाने मोडून टाकली. आम्ही तुला सोडणार नाही. आम्ही बकरा जसा कापतो तसं तुला कापू. श्वेता महाले आमदारीन तुझ्या नरड्यावर पाय देऊन तुला घरड्यापासून तुझे शीर धडावेगळे करून तुझ्या शरीराचे तुझे तुकडे खाडखूड करून तुझे मास व रगत हे आम्ही बोटी बोटी करून खाऊ किंवा नरड्याला प्रत्यक्ष तोंड लावून तुझा नरडा फोडून घोठ घेऊ”, अशा शब्दांत श्वेताताईंना जीवानिशी ठार मारण्याची धमकी या पत्रांत देण्यात आली आहे.या पत्रानंतर हिंदू समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, हे पत्र खरेच विशिष्ट समाजाच्या व्यक्तीने लिहिले की दोन धर्मीयांत तेढ निर्माण करून वातावरण खराब करण्याचा आणि श्वेताताईंच्या हत्येचा कट कुणी तरी त्यांच्या विरोधकांनी रचला आहे? असा संशय आता निर्माण होत आहे. दरम्यान, या पत्राप्रकरणी आ.
श्वेताताई महाले यांनी चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५१ (३), ३५१ (४) यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. हे पत्र पोस्टाद्वारे आलेले असल्याने आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान चिखली पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. दरम्यान, पत्रातील गंभीर स्वरूपाची भाषा पाहाता, श्वेताताईंच्या जीविताला मोठा धोका असल्याने त्यांना तातडीने चोवीस तांस सशस्त्र 
“आम्ही बोकड्याची नरडी कापतो तशी तुझी नरडी कापू; नरड्यावर पाय देऊन तुझे मुंडके तोडू”!
0
9
5
0
9
2
Users Today : 40
Leave a comment