चिखलीच्या लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नातून चिखलीतील ग्रामीण रुग्णालयाला गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी यंत्र मिळाले असून, त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच आ. श्वेताताईंच्याहस्ते छोटेखानी समारंभात पार पडला. गर्भाशयाचा कॅन्सर हा महिलांसाठी जीवघेणा आजार असून, या कॅन्सरचे निदान आता चिखलीतील ग्रामीण रुग्णालयातच होणार आहे. आ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली मतदारसंघातील विकासकामांची मालिका अबाधित राखत, ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे सर्वाइकल कॅन्सर डिव्हाईस (गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी यंत्र) दिले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी आरोग्यासंबंधी शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी सक्रीय प्रयत्न करावे, तसेच आशा स्वयंसेविका यांनी कर्करोगविषयी जनजागृती करून कर्करोग तपासणी व प्रतिबंध करण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. सुदैवाने चिखली मतदारसंघ, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या तीनही ठिकाणी जनहित पाहणारे जनतेचे सरकार असल्याने आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री कार्यालयासोबतदेखील अतिशय जवळकीचे संबंध असल्याने चिखलीच्या मूलभूत विकासाचे नवीन पर्व सुरु होत आहे. या कामामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनीदेखील जनतेला अधिक चांगली सेवा देता यावी म्हणून अधिक परिश्रम घ्यायला हवे, अशी भावनादेखील यावेळी आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली.या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, स्त्रीरोगतज्ञ डॉ.अजबराव वसु, आयएमएचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर दळवी, भाजप शहराध्यक्ष अध्यक्ष पंडितराव देशमुख, भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, रुग्णालय समिती सदस्य, नामु गुरुदासानी, विजू नकावल, सुभाष आप्पा मंगरूळकर, पंजाबराव धनवे, युवराज भुसारी यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. सैय्यद उमर, डॉ. ए. टी. खान, डॉ. उमेश सावजी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कणखर, डॉ. अमोल राजपूत, डॉ. गायकवाड, डॉ. विठ्ठल काळूसे, डॉ. राहुल राजपूत, डॉ. धनंजय परिहार, डॉ. वैभव शिंदे, डॉ. साजिद खान, डॉ. दीपाली भारसवडकर (जोशी), डॉ. प्रीती रिंढे, डॉ. आरिफ बेग, डॉ. फारुक शेख, श्री. किशोर गवई, श्री. कैलास गवई आदी उपस्थित होते.
Users Today : 40