उद्या नांदुरा शहरात संत गाडगे महाराज जयंती सोहळयाचे आयोजन

Khozmaster
1 Min Read
नांदुरा 🙁 तालुका प्रतिनिधी )

श्री संत गाडगे महाराज सेवा समिती नांदुरा जिल्हा बुलडाणा व महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ जयंती उत्सव या रूपाने रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी करत असून या कार्यक्रमास सर्व समाज बांधव बंधू-भगिनींनी व गाडगेबाबा प्रेमी यांनी जयंती उत्सवात सहपरिवार सहभागी व्हावे. आपले प्रतिष्ठाने दुकाने सदर दिवशी बंद ठेवावी. व इतर स्नेही बांधवांनाही सहभाग नोंदवावा. परीट धोबी सेवा मंडळ संत गाडगे महाराज जयंती २३ फेब्रुवारी २०२५ रोजी (स्थळ) श्री संत गाडगे महाराज सभागृह राधे नगर जळगाव जा रोड नांदुरा यामध्ये सदर दिंडी सोहळा रॅली, रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी ठीक सकाळी ८ वाजता श्री संत गाडगे महाराज पुतळा जलशुद्धीकरण केंद्र येथून सुरू होईल. तरी सर्व समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे. कार्यक्रमानंतर लगेच महाप्रसाद दुपार १२.३० ते ४ या वेळेत राहील. सदर दिंडी सोहळयामध्ये सहभागी महिलांनी पिवळी साडी घालून यावी व पुरुषांनी पांढरे नेहरू शर्ट पायजमा घालावा असे आवाहन श्री संत गाडगे महाराज बहुउद्देश संस्था नांदुरा शहर व तालुका श्री संत गाडगे महाराज सेवा समिती नांदुरा आणि सर्व धोबी समाज पदाधिकारी व समाज बांधव तालुका नांदुरा यांनी केले आहे

0 9 5 0 9 2
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *