कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची सोडवणूक करणार – माजी आमदार संजय रायमुलकर

Khozmaster
2 Min Read

मेहकर 🙁 शहर प्रतिनिधी )
कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील. याबाबत येत्या आठवड्यात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यातून सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन माजी आमदार संजय रायमुलकर यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला दिली दिले.
आज दुपारी स्थानिक विश्रामगृहात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने रायमुलकर यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्या कथन केल्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाने मार्च २०२४ मध्ये परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे ,मात्र त्याची अमलबजावणी होत नसल्याची माहिती संबंधित कर्मचारी प्रतिनिधींनी संजय रायमुलकर यांना दिली.
राज्याचे सामाजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संजय रायमुलकर यांनी प्रदीर्घ चर्चा केली. येत्या आठवड्यात आरोग्य विभागातील सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक मंत्रालयात घेण्यात येणार असून त्यात सर्व प्रश्नांची सोडवणूक निश्चितपणाने केले जाईल, असे ना. आबीटकर यांनी सांगितले. सदर कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्य केलेले असून त्यांच्या प्रश्नाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची सोडवणूक करणे गरजेचे असल्याचे रायमुलकर यांनी सांगितले.
यावेळी कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटनेचे एस. डी .लंबाटे, एस .आर .सोळंके, एम .टी. जुगाडे ,एस .आर. डाखोरे ,ए .टी. लोखंडे, ए .एस. सोनुने ,जी.एम. डुकरे, एस. आर. शिरसाट ,मुरलीधर लांबाडे, धनंजय रौंदळे, गजानन बोरकर, प्रभाकर लांबाडे ,शंकर मोघाड, पंडित गायकवाड आदी उपस्थित होते.

0 9 5 0 9 2
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *