पक्षी निरिक्षणाचा छंद म्हणजे ताठ मानेने जगण्याचा मंत्र. -अमोल सांवंत

Khozmaster
2 Min Read
बुलढाणा 🙁 शाहिद शहा ) 

चला मैत्री करूया पक्षांची या पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा वन विभाग व मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यामानाने दि. 22 व 23 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमात दिनांक 22 फेब्रुवारी रोजी डॉ. गजेंद्र निकम व क्षितीज निकम यांनी काढलेल्या छायाचित्रांचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करून विविध पक्षांचे अधिवास, त्यांच्या सवयी ते कुठे दिसू शकतात, त्यांच्या स्थलांतराचा कार्यकाळ कधी व कसा असतो. याविषयी माहिती दिली या कार्यक्रमासाठी वनविभागाचे आरएफओ अभिजीत ठाकरे यांची उपस्थिती होती. दि. 23 फेब्रुवारी रविवारी सकाळी वनविभागाच्या राणी बागेत पक्षी निरीक्षण करण्यात आले. या पक्षी निरीक्षण कार्यक्रमात डॉ. गजेंद्र निकम, क्षितीज  निकम यांच्या सोबत निसर्ग कट्टा अकोलाचे संस्थापक पक्षी अभ्यासक अमोल सावंत, डॉ. यशवंत पाटील, डॉ. विनायक हिंगणे, डॉ. निखिल जवरे,संतोष सुरडकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणासंबंधी माहिती देऊन प्रत्यक्ष पक्षी निरीक्षण करून त्या नोंदी घेतल्या. याप्रसंगी 50 बाल दोस्तांनी या पक्षी निरीक्षण कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवत विविध पक्षांची माहिती जाणून घेतली. या प्रसंगी डॉ.हेमंतजोशी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती. राणी बागेत बुलबुल, सोनपाठी सुतार, भारद्वाज, धनेश, कोतवाल, बगळा, पोपट,हरियाल यासह विविध पक्षी दिसून आल्याच्या नोंदी उपस्थित बालकांनी घेतल्या. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना अमोल सावंत यांनी बालकांची बोलतांना सांगितले की आजची रविवारची सकाळ ही निश्चितच इतर सकाळ पेक्षा वेगळी असेल. लवकर उठून तुम्ही पक्षी निरीक्षणासाठी आलात हे निश्चितच अभिनंदनीय आहे. आपल्या परिसरात असलेल्या पक्षांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. पक्षी निरीक्षण म्हणजेच आपल्याला ताठ मानेने कसे जगायचे हे शिकवणारे असते. याप्रसंगी या पक्षी निरीक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्या बालकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपवनसंरक्षक सरोज गवस यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वैशाली निकम. श्याम पवार ,श्रद्धा पवार, रविकिरण टाकळकर, समाधान एडके यांच्यासह मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता.

0 9 5 0 9 5
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *