आज विधान भवन मुंबई येथे खामगांव ते जालना मंजूर झालेल्या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपल्या हिश्याचा ५०% निधी उपलब्ध करून हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरु करावा या मागणी साठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या लोकप्रतिनिधी यांनी निवेदन दिले यामध्ये शिवसेना नेते खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब,माजी मंत्री तथा आमदार डॉ.संजय जी कुटे,आमदार श्री.संजय जी रायमुलकर,आमदार श्री.आकाश जी फुंडकर उपस्थित होते.
तरी महाराष्ट्र शासनाने ५०% राज्याचा हिस्सा भरून लवकरच या रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे याबाबत विनंती केली असता उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब सकारात्मक प्रतिसाद देत मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल असे अश्वासित केले.
Users Today : 45