शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना नेत्या अॅड. जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Khozmaster
2 Min Read


बुलढाणा :- ( जिल्हा प्रतिनिधी )

नीलम गोहे या उद्धव ठाकरे यांनी केलेले उपकार विसरल्याची टीका शेळके यांनी यावेळी केली. त्या म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षासोबत गद्दारी करून तीन वर्षांपूर्वी काही गद्दार पक्षातून बाहेर पडले. त्यांनी पन्नास खोके घेऊन पक्षासोबत पर्यायाने सबंध महाराष्ट्रासोबत गद्दारी करत लाचारी पत्करली. सर्व गद्दार शिवसेनेतून बाहेर पडले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परंतु आजही महाराष्ट्रात ठाकरे नावाचा दरारा कायम आहे. ठाकरे यांच्या नावाने आजही गद्दारांना घाम फुटतो. त्यामुळेच एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, अशी आक्षेपार्ह विधाने करून शिवसेना पक्षप्रमुखांना बदनाम करण्याचे काम नीलम गोहेंसारखे गद्दार करत आहेत.
१९९८ मध्ये गोहे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी दिली. २००२ पासून आतापर्यंत चारवेळा त्यांना विधान परिषदेवर निवडून येण्याची संधी दिली. तसेच पक्षप्रमुखांच्याच उपकरांवर विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून आजही त्या कार्यरत आहेत. ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक पदे दिली, मानसन्मान दिला, पक्षात आणि समाजात ओळख मिळवून दिली. त्या पक्षाप्रती आणि शिवसेना पक्षप्रमुखांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची सोडून अशा प्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे असल्याचे शेळके म्हणाल्या.
या आंदोलनात जिल्हाध्यक्षा चंदा बढे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विजया खडसान, उपजिल्हाप्रमुख कल्पना बोधेकर, उपजिल्हाप्रमुख संजिवनी वाघ, लोणार तालुकाप्रमुख तारामती जायभाये, मेहकर तालुकाप्रमुख स्वाती नवले, सहसंघटक आरती देशमुख, शहरप्रमुख लता शिंदे, शहर प्रमुख दुर्गा सुरुशे, अर्चना शेळके, भावना पाटील, पूजा दाभाडे, रोहिणी राजपूत, वैशाली वाकोडे, गायत्री गायकवाड, शुभांगी बाहेकर, मीना गव्हाणे, नंदा अंभोरे, रत्ना शेळके, दीपाली जाधव, दीपाली राजपूत, वर्षा सोनुने, शालिनी मोरे, जिजा चाटे, प्रयाग सोनुने, गोदावरी राऊत, रंजना जायभाये, धृपदा सानप, संगीता मुठे, स्मिता वराडे, सोनाली वाघ यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
0 9 5 0 9 6
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *