साखरखेर्डा येथे वाळूमाफियांचा राडा; जोरदार दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

Khozmaster
2 Min Read
साखरखेर्डा 🙁  तालुका प्रतिनिधी )

खडकपूर्णा नदीपात्रातून दररोज रात्री सुसाट वेगाने अवैध वाळू वाहतूक सुरूच असून, या वाळूमाफियात टोळीयुध्द भडकल्याची घटना साखरखेर्डा येथील एका पेट्रोलपंपावर दि. २५ फेब्रुवारीरोजी रात्री पहावयास मिळाले. आपले बिंग फुटले तर अनर्थ होईल त्यामुळे राडा केल्यानंतर हे वाळूतस्कर पोलिस येईपर्यंत फरार झाले. दोन गटांतील या जोरदार राड्यांत त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली व वाहनांच्या काचा फोडल्या व नंतर घटनास्थळाहून पळून गेले. साखरखेर्डा येथे आणि परिसरात दररोज रात्री ८ ते १० टिप्पर अवैध मार्गाने वाळूची वाहतूक करीत चोरटी वाळूविक्री करीत आहेत. याबाबत स्थानिक पत्रकारांनी महसूल विभागाला माहिती दिली होती. परंतु, साखरखेर्डा भागात एकही महसूलचे पथक कार्यरत नसल्याने वाळूमाफियांचे काम निमुटपणे चालू आहे. दि. २५ फेब्रुवारीरोजी रात्री दोन टिप्पर १० वाजेच्या सुमारास साखरखेर्डा येथे आले असता, ‘वाळू तू का टाकली?’ या कारणावरून दोन टिप्पर चालकात वाद झाला. त्याचे रूपांतर जोरदार टोळीयुद्धात झाले. यात एका गटाने दुसऱ्या वाळूमाफियांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या. ही दगडफेक व राडा सुरु असताना गर्दी जमा झाली होती. परंतु, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच वाळूमाफियांनी घटनास्थळावरुन पळ काढला, रस्त्यावर काचेचा सडा पडलेला होता. त्यामुळे वाळूमाफियांची दादागिरी किती वाढली याचा प्रत्यय दिसून आला. साखरखेर्डा भागात चक्क धरणातून वाळूचा उपसा करुन टिप्पर अंढेरा, मेरा चौकी,शिंदी मार्गे साखरखेर्डा येथे येते. या मार्गावर कोठेही पथक नाही. वाळू वाहतूक करीत असताना त्यातून पाणी झिरपत साखरखेर्डापर्यंत पडलेले असते. याची कल्पना महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आली असता, एकाही वाहनांवर कारवाई करण्यात आली नाही.

0 9 5 0 9 7
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *