गोकुळसिंग राजपूत :–(छत्रपती संभाजीनगर )
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे परिसरात व गावात होळी हा सण म्हणजे अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. पालापाचोळ्याचा नायनाट करून स्वच्छता करण्यासाठी होळी सण साजरा केला जातो.सावळदबारा ग्रामीण भागात प्रत्येक गाव-पाड्यात २०२५ मार्च गुरुवार रोजी रात्री हा उत्सव जल्लोषात साजरा करून पूजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणेच सावळदबारा परिसरात यंदा धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजनही विधिवत करण्यात आले; तर पर्यावरणाचा जागर करत रंगपंचमीला पाण्याचा वापरही कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले.परिसरात ठिकठिकाणी बच्चे कंपनीचा जल्लोष मोठ्या प्रमाणात होता. त्याचबरोबर नैसर्गिक रंगाने होळीचा मनसोक्तपणे आनंद लुटतानादेखील रासायनिक रंगांना नागरिकांकडून बगल देण्यात आली.
चक्रधर स्वामी मंदिराजवळ गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी तरुणाईच्या आनंदाला उधाण आले होते. होळीच्या दिवशी नवविवाहित मानाचे जोडेही उपस्थित होते. त्यांनी विधिवत होळीभोवती प्रदक्षिणा घातली व होळी मातेकडे पुढील वैवाहिक आयुष्य सुखा-समाधानात जावे म्हणून साकडे घातले. होळीचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. पुजारी, शिंदे, कोलते पाटील, सुर्यवंशी,बुढाळ,गायकवाड, राजपूत बांधवांनी नटून-थटून कोळी बँडच्या तालावर पारंपरिक नृत्य केले. पारंपरिक पद्धतीने मनोरा रचून होळीची विधिवत पूजा करण्यात आली. होळी सणानिमित्त बालगोपाल यांची गर्दी पाहावयास मिळाली. या वेळी बिट जमादार मिरखा तडवी, शिवदास गोपाळ पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्षता घेण्यात आली होती.नृत्याचा मनमुराद आनंद
गृहसंकुलांत राहणाऱ्या नागरिकांनी एकत्र येत रंगपंचमीचा आनंद लुटला. या वेळी त्यांनी होळी गीतावर मनमुराद नृत्य केले. मित्र मंडळी व ग्रामस्थांनी गावागावांत होळीनिमित्त रंगांची उधळण केली. काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Users Today : 21