गोकुळसिंग राजपूत :–(छत्रपती संभाजीनगर)
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात व सिल्लोड परिसरात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना
नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची गंभीर बाब माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या समोर आली आहे. यावरुन अधिकाऱ्यांना व पिक कंपनीला खडसावत पीक विमा योजनेची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात यावी, अशी सूचना देऊन यावर्षीचा खरीपाचा २०२४ पिक विमा आमदार अब्दुल सत्तार यांनी शासन दरबारी भांडून सिल्लोड सोयगाव तालुक्याचा पिक विमा मंजूर करुन घेतला या बद्दल सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी मानले माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत.सोयगाव सिल्लोड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. त्यामुळं पंचनामे करुन शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देणं गरजेचं होतं.मात्र, पीक विमा कंपनीकडून ज्यांच्या पिकांचं नुकसान झालं, त्याची नोंदच करण्यात आली नाही. तर ज्यांची नोंद झाली त्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचं माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आले होते
त्यांनी यावरुन अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा पैसे येण्यास सुरुवात झाली आहे शेतपिकांचं नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री पीक विमा योजना ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. ही जबाबदारी काही खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे.
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पीक विमा काढण्याचं काम हे ‘ओरिएंटल इन्शुरन्स’ या कंपनीला देण्यात आलं. या वर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळं जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव भागात शेतमालाचं अतोनात नुकसान झालं. यात कापूस आणि सोयाबीनचं प्रमाण सर्वाधिक आहे. यावेळी पीक विमा कंपनीनं पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं आवश्यक होते.शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या संदर्भात दावा दाखल केला. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला कंपनीनं वाटाण्याच्या अक्षता दाखवली होती परंतु आमदार अब्दुल सत्तार यांनी पाठपुरावा करून अखेर पिक विमा मंजूर करून घेतला आणि शेतकऱ्यांना मिळाल्याने सभापती धरमसिंग चव्हाण नांदा तांडा यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचे मानले आभार
Users Today : 22