राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा 🙁 दत्ता हांडे )

आरोग्य, हीच खरी धन संपदा” या म्हणीचा वारसा घेत देऊळगाव राजा शहरातील एकमेव CBSE स्कूल म्हणजेचं राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर अंतर्गत दि. 11/03/2025 रोजी दंत तपासणी करण्यात आली. शाळेमध्ये बुद्धीचा विकास तर व्हावाचं परंतु आरोग्य ही जपणे तितकंच महत्वाचे, या विचारांला सादर करत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दंत तपासणी साठी देऊळगाव राजा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर व समाजसेवक डॉ. प्रशांत देशमुख (BDS) यांना बोलाविण्यात आले. दंत तपासणी शिबिरामध्ये तपासणी करत दातांची निगा कशी राखावी याचे धडे सुद्धा डॉ. प्रशांत देशमुख यांनी दिले. अभ्यासामध्ये गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव सुदृढ असणे गरजेचे आहे असे डॉ. देशमुख आपल्या व्याख्यानात म्हणाले. यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा डॉ. मीनलताई शेळके तसेच सचिव डॉ. रामप्रसाद शेळके, सीईओ सुजित गुप्ता सर, प्राचार्या डॉक्टर प्रियंका देशमुख मॅडम, उपप्राचार्य फैजल ओस्मानी सर, यांची उपस्थिती होती. यावेळी निलेश गवई सर यांनी संस्थेच्या वतीने डॉ. प्रशांत देशमुख यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

0 9 5 1 1 2
Users Today : 60
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *