देऊळगाव राजा 🙁 दत्ता हांडे )
“उधळूया रंग आनंदाचे, क्षण साजरे करूया होळीच्या सणाचे” “अरे, बुरा ना मानो, होली है” अशा उत्साहात राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये दि. 13 मार्च रोजी धूलिवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षणासोबतच आपल्या भारतीय संस्कृतीची जतन करणारी स्कूल म्हणजेच राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल अशी आख्यायिका प्रसिद्ध झालेली आहे. त्यावर दुजोरा देत आज दि. 13 मार्च रोजी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये धूलिवंदनाचा मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. रामप्रसाद शेळके सर यांनी मुलांना फक्त कोरडे रंग खेळण्याचे आव्हान केले. पाण्याचा गैरवापर व आरोग्याचा धोका टाळण्यासाठी ओले रंग खेळण्याऐवजी कोरडे रंग खेळावे असे ही ते याठिकाणी म्हटले. रंगाच्या या खेळात फक्त विद्यार्थीच नव्हे तर सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा आनंद लुटला. रंग खेळताना दुखापत होऊ नये यासाठी शिक्षकांकडून विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा डॉ. मीनलताई शेळके तसेच सचिव डॉ. रामप्रसाद शेळके, सीईओ सुजित गुप्ता सर, प्राचार्या डॉक्टर प्रियंका देशमुख मॅडम, उपप्राचार्य फैजल ओस्मानी सर, यांची उपस्थिती होती. यावेळी निलेश गवई सर यांनी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्याना होळीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
Users Today : 60