चिखली 🙁 तालुका प्रतिनिधी )
बंजारा समाजाने आपल्या अनोख्या वैशिष्ट्यपूर्ण होळी खेळण्याच्या परंपरेने आपल्या समाजाच्या लोककला जिवंत ठेवलेल्या आहेत. जागतिकीकरणाच्या वाऱ्यात “मूळ” सोडण्याची रीत जोरात सुरु असतांना देखील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारा समाजाची वस्ती/तांडे असलेले असोला व मोहदरी या गावामध्ये अजूनही आपल्या पारंपारिक लोकनृत्याने व बंजारा समाजाची होळी साजरी करण्यासाठी खास गायल्या जात असलेल्या “लेंगी” गीताने होळी साजरी केली जात असते. रंगपंचमीच्या दिवशी बंजारा समाजातील स्त्रिया व पुरुष आपले पारंपरिक वेश परिधान करून गोल रिंगनामध्ये “लेंगी” गायन करताना नृत्याचा ठेका धरत असतात. यावर्षी चिखली विधानसभेच्या आमदार विकास कन्या सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी सुद्धा आपल्या बंजारा समाजातील भगिनींसोबत पारंपरिक वेश परिधान करून नृत्याचा ठेका धरला, समस्त बंजारा समाजातील भगिनींमध्ये उत्सुकता आणि उत्साहाची एक लहर धावून आली. चिखली तालुक्यातील असोला व मोहद्री या बंजारा बहुल गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या रंगपंचमीच्या सणाला आमदार सौ. श्वेताताई महाले यांना निमंत्रित करण्यात आले होते. सदर निमंत्रणाचा स्वीकार करून सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी यावर्षीची आपली रंगपंचमी बंजारा समाजातील भगिनींसोबत साजरी केली. प्रत्येक समाजामध्ये दुधातील साखरेप्रमाणे विरघळणाऱ्या सौ.श्वेताताई महाले पाटील या ठिकाणी देखील अतिशय सहज व उत्स्फूर्तपणे वावरताना दिसून आल्या. त्यांनी या ठिकाणी या नेहमीपेक्षा वेगळ्या व वैशिष्ठपूर्ण गीत व नृत्याचा आनंदही घेतला. रंगबिरंगी प्राचीन वेशभूषा, उधळले जाणारे विविध रंग, बंजारा समाजाच्या प्रथा, रुढी, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवणारे लेंगी गीत, आणि हे लेंगी गीत गातांना डफाच्या तालावर नृत्य करणारे बंजारा बांधव व आ. सौ. श्वेताताई महाले पाटील हे समीकरण अतिशय आणंददायी व नेत्रसुखद होते.
Users Today : 62