शिवाजी महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंग निर्मिती कार्यशाळा

Khozmaster
2 Min Read

मोताळा :- ( तालुका प्रतिनिधी )

स्थानिक शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनात एकदिवसीय पर्यावरण पूरक रंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन १३ मार्च रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग व नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गजानन जाधव, कार्यशाळेचे उद्घाटक प्रा. सुनील मामलकर व प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. अविनाश मेहेरकर, प्रा. नंदा मास्कर, डॉ सुप्रिया बेहेरे, प्रा. डॉ चित्रा मोरे, प्रा. डॉ अभय ठाकूर व प्रा. डॉ अरुण गवारे हे होते. धुलीवंदनाच्या सणाला फार मोठ्या प्रमाणात कृत्रिम रंगांचा सर्रास वापर केल्या जातो. हे रंग आपल्या आरोग्याला व पर्यायाने निसर्गाला हानिकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडवून आणणे हा होता. कार्यशाळेमध्ये पळस, बीट, हळद, पालक व काटेसावर आदी वृक्षाची पाने व फुले वापरून नैसर्गिक पर्यावरण पूरक कोरडा व ओला रंग तयार करण्यात आला. कार्यशाळेत तयार केलेला रंग सर्व उपस्थित मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आला. कृत्रिम रंगाचे दुष्परिणाम लक्षात घेता पर्यावरण पूरक रंग वापरणे ही काळाची गरज असून त्यासाठी कौशल्य घेऊन स्वतःचा रंग निर्मिती व्यवसाय सुरु करावा असे आवाहन कार्यशाळेचे उद्घाटक प्रा. डॉ. सुनील मामलकर यांनी व्यक्त केले. पर्यावरण पूरक रंग वापरण्याचे आवाहन यावेळी प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी केले.कार्यशाळेचे समन्वयक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रविण ठेंग व आयोजन सचिव प्रा. कल्पेश उदयकर व प्रा. हर्षदा राठोड हे होते. या कार्यशाळेला प्रा. श्रीवास, प्रा. हिरडे, प्रा. गणेश सोळंकी, प्रा. विष्णू भगिले, प्रा. डॉ. नंदकिशोर अमृतकर, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 5 1 1 4
Users Today : 62
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *