भानुदास, एकनाथाच्या जयघोषात सोमपुरी महाराजांच्या पायी दिंडीचे प्रस्थान

Khozmaster
1 Min Read

वर्दडी बुद्रुक 🙁 तालुका प्रतिनिधी )

संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथील जलसमाधी (नाथषष्ठी ) सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमपुरी बाबांच्या पालखीचे १२ मार्च रोजी पैठणकडे प्रस्थान झाले. प्रारंभी सकाळी दिंडी सोहळ्याचे विधिवत पूजन झाल्यानंतर पंचपदी घेऊन नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी ठिकठिकाणी सडा समार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्य. गावासह परिसरातील भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन पालखीला निरोप दिला. बेलवाडी तांडा येथे दिंडीतील वारकऱ्यांना चहा-फराळाचे वाटप करण्यात आले. दिंडी प्रवासा दरम्यान दररोज सकाळी काकड आरती सायंकाळी हरिपाठ व रोज रात्री मुक्कामाच्या ठिकाणी मुकुंद महाराज पारेगावकर यांचे हरिकीर्तन होत आहे. आज १३ मार्च रोजी खणेपुरी (जि.जालना), १४ मार्च पानेगाव, १५ मार्च शिरनेर, १६ मार्च पाचोड (जि.छत्रपती संभाजी नगर), १७मार्च आखातवाडा, १८ मार्च आपेगाव, संत ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मगाव येथे शेवटचा मुक्काम करून १९ मार्च रोजी पैठण येथे पालखी सोहळा पोहोचणार आहे. तीन मुक्काम करून शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या दर्शनानंतर २२ मार्च रोजी स्वगृही वर्दडी येथे पोहोचणार आहे. दिंडीमध्ये बाळ-गोपाळ, भालदार-चोपदार, विणेकरी-टाळकरी, वारकरी व महिलांचा समावेश आहे. पालखी सोहळा प्रमुख तानाजी काकडे, पंडित काकडे, उद्धवराव नागरे, पांडुरंग बोरभागे, सुभाष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे.

0 9 5 1 1 4
Users Today : 62
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *