गटार योजनेचे खोदकाम सुरू असताना आढळले भुयार

Khozmaster
1 Min Read

सिंदखेड राजा :- ( तालुका प्रतिनिधी )

सध्या सिंदखेडराजा येथे नगरपरिषद मार्फत भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. सदर काम सुरू असताना ऐतिहासिक व पुरातन सावकार वाड्याच्या दक्षिण दिशेला साधारणत ४० मीटर अंतरावर लोकवस्तीत बालाजी मंदिराच्या पाठीमागे जमिनीत खोदकाम सुरू असताना भुयार आढळून आले यावेळी काम करणाऱ्या कामगारांनी त्या भुयारामध्ये लोखंडी तार टाकला असता दहा फूट जमिनीमध्ये तार खोलवर गेला. याठिकाणी नुसती भुयार आहे कां भुयारी मार्ग आहे, हे सध्या गुलदस्त्यातच असून खोदकाम केल्यास इतिहासाचा अनमोल ठेवा समोर येऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सिंदखेडराजा नगरी राजे लखुजीराव जाधव यांची कर्मभूमी व राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असल्याकारणाने सिंदखेडराजा शहर व परिसरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे खोदकाम करीत असताना इतिहास समोर आलेला आहे. यापूर्वी काही दिवसापूर्वी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर विकास कामासंदर्भात उत्खनन सुरू असताना जमिनीमधून शेषशाही भगवान विष्णूची मूर्ती निघाली होत. तसेच शहरात अनेक ठिकाणी ऐतिहासिक ठेवा समोर आलेला आहे .

0 9 5 1 1 4
Users Today : 62
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *