*रेखाताई मनेरे शहीद भगतसिंग वीर योद्धा राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित*

Khozmaster
4 Min Read

गोकुळसिंग राजपूत :–(छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)

सविस्तर वृत्त असे की परभणी जिल्ह्यातील पाथरी गावच्या कन्यारत्न श्रीमती रेखाताई मनेरे यांना अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या राजवड ता.पारोळा जि.जळगाव येथे दिनांक. 8/9 मार्च 2025 रोजी दोन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशन राजवड शबरी फार्म हाऊस येथे संपन्न झाले हे अधिवेशन ,जागतिक महिला* *दिनानिमित्त ,आयोजित करण्यात आले आणि कर्तुत्ववान महिलांना शहीद भगतसिंग योद्धा राज्य स्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले  सन्मान चिन्ह देऊन सन्मान व गौरव करण्यात आला या दिमागदार सोहळ्यामध्ये संपूर्ण देशामधून आलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा* *सन्मान करण्यात आला २०२४ /२० २५ या वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला/ कार्यकर्त्यांनी काम करीत असताना सामाजिक सलोखा जोपासून समाजकार्यासाठी सेवा करत असताना अमुल्य योगदान दिले त्याचबरोबर सर्व घटकातील* *महिलांना  पिडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे काम केलं त्या पदाधिकाऱ्यांचा  शहीद भगतसिंग वीर योद्धा राज्य स्तरीय  पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले, परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे राहत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ.रेखाताई मनेरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत व नेहमी सक्रिय असलेल्या तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना* *सक्षमीकरण व सक्षम करण्यासाठी अनेक वर्षांपासून अनुभव असलेल्या मा.रेखा मनेरे हया बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत व CRP म्हणून बचत गट स्थापन करण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि संघटनेच्या माध्यमातून  पिडित महिलांना न्याय मिळवून दिला संघटनेच्या कामाला गती दिली संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तसेच अनेक कौटुंबिक हिंसाचाराच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून दिला व नवरा बायकोची तडजोड प्रकरणा मध्ये न्याय मिळवून दिला त्यामुळे त्यांच्या* *कार्याची दखल घेऊन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते व शिफारशीनुसार रेखाताई मनेरे यांना शहीद भगतसिंग वीर योद्धा राज्य स्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे..? या दोन दिवस व राष्ट्रीय अधिवेशनास राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव* *देशमुख राष्ट्रीय सरचिटणीस अमोलजी नानाजकर राष्ट्रीय सरचिटणीस राजू पाटील सिपांळकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्र पाटील प्रदेशाध्यक्ष अँड राणीताई स्वामी प्रदेश अध्यक्ष पंडितराव तिडके प्रदेश निवड कमिटी अध्यक्ष* *मा.गोकुळसिंग सुखदेव राजपूत मराठवाडा विभागीय अध्यक्ष संभाजीनगर सावळदबारा,*अनिल दादा देसले प्रदेश अध्यक्ष सैनिक विभाग उल्हास दादा पाटील महाराष्ट्र युवती प्रदेश अध्यक्ष मा.सना ताई शेख, प्रदेश सेक्रेटरी*
*मा.सारीखा ताई  नागरे , प्रदेश कार्याध्यक्ष निर्मलाताई बुले,मा . शंकरराव देशमुख मराठवाडा विभागाच्या प्रमुख यासह अनेक मान्यवराच्या शुभ हस्ते सामाजिक कार्यकर्तेत्या* *मा.सौ.रेखाताई मनेरे यांना शहीद भगतसिंग वीर, योद्धा राज्य स्तरीय  पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्यांच्या* *कार्याचे अभिनंदन होत आहे रेखाताई मनेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा.पाथरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा व पाथरी तालुका सरचिटणीस तसेच परभणी जिल्हा युवती शहर संघटक व पाथरी शहर* *अध्यक्षा या पदावर कार्य केलेले आहे आणि  चालू सध्याच्या काळात शिवसेना शिंदे गट यामध्ये पाथरी शहर अध्यक्षा या पदावर सद्या कार्यरत आहेत आणि रेखा मनेरे यांच्या कार्याची व कामाची दखल घेऊन त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त शहीद भगतसिंग योद्धा राज्य स्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे
0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *