गोकुळसिंग राजपूत :–(जामनेर प्रतिनिधी)
पहुर , ता . जामनेर ( ता . १४) जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावातील वैकुंठ धाम स्मशानभूमीत सांत्वन शेडचे रखडलेले काम पूर्णत्वास आले असून ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे व सहकाऱ्यांच्या भिकमांगो आंदोलनाचे हे यश असल्याचे बोलले जात आहे .
सदर सांत्वन शेडचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडल्याने ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांनी प्रशासनाकडे दाद मागितली . दरम्यान त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भीक मांगो आंदोलनही पुकारले होते .
सदर सांत्वन शेड पूर्णत्वास आले असून भीक मांगो आंदोलनात दरम्यान १०३२ रुपयांचा निधी जमा झालेला होता . निधीचा विनियोग करून तसेच कै .कासाबाई व कै . गोविंदा गणपत घोंगडे आणि कै . पंडित गोविंदा घोंगडे यांच्या स्मरणार्थ घोंगडे परिवार पहुर यांच्यातर्फे सांत्वन शेडमध्ये बैठक बाक साकारण्यात आला . या बैठक बाकाचे आज आंदोलन करते विक्रम घोंगडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . या प्रसंगी विष्णू घोंगडे , अतुल राऊत अश्विन घोंगडे उपस्थित होते .
Users Today : 62