राजर्षी शाहू फार्मसीच्या रासेयो विशेष शिबिराची सांगता

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )

स्थानिक राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने माळविहीर येथे सुरु असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची ९ मार्च रोजी सांगता करण्यात आली. समारोपाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्याप्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिरीष जैन तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हनुमंत भोसले, सरपंच अर्चनाताई आडवे, दिलीपराव आडवे, उपसरपंच संजय खैवान, संजय आडवे, देविदास आडवे, गणेश आडवे, दिलीप घोडके, दिनकर आडवे, विष्णू गाढे, संजय आडवे, प्रा. शितल रेदासनी, डॉ. प्रकाश केंद्रे, डॉ. सोमनाथ विभूते उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित सालकुटे यांनी शिबिराच्या अहवालाचे वाचन केले. शिबिरात गौराज जाधव यांनी दररोज सर्वांना योग व प्राणायामचे धडे दिले. सतीश सावजी व त्यांच्या टीमने सर्वांना सहजयोग शिकवला. श्रमदानाच्या माध्यमातून गावातील कामे करण्यात आली. सिकलसेल, अनिमिया तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तगट व रक्तदाब तपासणी, दंत चिकित्सा शिबिरही पार पडले. आपत्ती व्यवस्थापनावर प्रा. स्वप्नील काळे यांनी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्य व त्याचे व्यवस्थापनावर डॉ. ज्ञानेश्वर मुंढे, शारीरिक क्षमतेवर श्रीसुश्ल शिंदे, डिजिटल साक्षरतेवर विशाल पाटील, आरोग्यावर डॉ. राजेश जतकर, डॉ. सचिन गवळी, डॉ. धनंजय भुसारी, डॉ. रश्मी लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरादरम्यान पार पडलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धेत उत्कृष्ठ रासेयो स्वयंसेवक पुरस्कार सुजित म्हस्के, उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्कार वैष्णवी कोकाटे तर जान्हवी गाढे हिच्या तोरणा गडास पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. हनुमंत भोसले यांनी गावातील मान्यवर व स्वयंसेवकांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. शिरीश जैन यांनी शारीरिक श्रमापेक्षाही बौद्धिक श्रमदानातून इतरांचे प्रश्न कसे सोडवता येईल यावर भर देण्यास सांगितले. सूत्रसंचालन साक्षी भोन्डेकर व जान्हवी गाढे तर आभार दिगंबर हुलगुंडे याने मानले.

0 9 5 1 1 4
Users Today : 62
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *